अंतराळातून असा दिसतो भारत! 2939 फोटोंपासून बनलाय 'हा' एक फोटो; ISRO ने दिला आश्चर्याचा धक्का

ISRO Shows How India Looks From Space: अंतराळामधून आपला देश कसा दिसत असेल असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोने दिलं आहे. इस्त्रोने अंतराळामधून काढलेले पृथ्वीचे काही फोटो शेअर केले असून हे फोटो दिसतात तितके साधे नाहीत. जाणून घ्या या फोटोंचं वैशिष्ट्यं...

Mar 31, 2023, 20:44 PM IST
1/6

ISRO Shows How India Looks From Space

ओशनसेट-3 नावाने ओळखल्या जाणाऱ्या इस्त्रोच्या अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइटने (EOS-06) हे फोटो काढले आहेत. हे सॅटेलाइट 2022 मध्ये श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन लॉन्च करण्यात आलं होतं. (सर्व फोटो - twitter/isro वरुन साभार)

2/6

ISRO Shows How India Looks From Space

ओशन कलर मॉनिटर तंत्रज्ञानाचा वापर करुन या सॅटेलाइटने काढलेले पृथ्वीचे फोटो इस्त्रोने शेअर केले आहेत. हैदराबादमधील इस्त्रो नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने हे फोटो डेव्हलप केले आहेत.

3/6

ISRO Shows How India Looks From Space

इस्त्रोने काढलेला हा प्रत्येक फोटो तयार करण्यासाठी जवळजवळ 300 जीबीचा डेटा वापरण्यात आला आहे. जवळजवळ 2939 फोटो एकत्र करुन हा एक फोटो बनवण्यात आला आहे. या फोटोचं गुणोत्तर सांगायचं झाल्यास यामधील एक पिक्सल म्हणजे 1 किमी अंतर असं गणित आहे.

4/6

ISRO Shows How India Looks From Space

या फोटोंमध्ये भारत अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हे सर्व फोटो 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान काढण्यात आले आहेत. हाय रेझोल्युशन फोटोंमुळे पृथ्वी आणि भारताचे फोटो इतके छान आणि स्पष्टपणे दिसत आहेत. ओशनसॅटने पाठवलेले लेटेस्ट फोटो हे दक्षिण अमेरिकेचे आहेत.

5/6

ISRO Shows How India Looks From Space

इस्त्रोने सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारताचे फोटो पाहून अनेकांचा उर भरुन आला आहे. अनेकांनी यासाठी इस्त्रोचे आबार मानले आहेत. 

6/6

ISRO Shows How India Looks From Space

इस्त्रोच्या ओशनसॅटने 2022 मध्ये मॅडस चक्रीवादळासंदर्भात माहिती दिली होती. दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये अर्जेंटीनाच्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या शेवाळाची ओळख पटवण्यासाठीही या सॅटेलाइटने मदत केली होती.