IPL2020: धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या १०० वा विजय

Sep 20, 2020, 18:57 PM IST
1/8

एम एस धोनी

एम एस धोनी

आयपीएल-२००८ पासून कर्णधार असलेल्या महेंद्र सिंह धोनीने 3 वेळा आयपीएल कप जिंकला आहे. आयपीएलमध्ये त्याने १५० सामन्यांपैकी १०५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

2/8

रोहित शर्मा

रोहित शर्मा

मुंबई इंडियंसला ४ वेळा कप जिंकवून देणारा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माने २०१३ मध्ये नेतृत्व करण्यास सुरुवात केली. त्याने १०५ सामन्यांमध्ये ६० वेळा सामने जिंकले आहेत.

3/8

विराट कोहली

विराट कोहली

मागील ९ सीजनमध्ये विराटने आरसीबीसाठी नेतृत्व करताना ११० पैकी ४९ सामने जिंकले आहेत. ५५ सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

4/8

डेविड वॉर्नर

डेविड वॉर्नर

सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) चा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) ने आयपीएल-२०१३ ते २०१७ दरम्यान ४७ सामन्यांपैकी २६ सामने जिंकले आहेत. तर २१ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.

5/8

स्टीव स्मिथ

स्टीव स्मिथ

राज्स्थान रॉयल्स (Rajasthan Royals) चा कर्णधार दिग्गज स्टीव स्मिथ (Steave Smith) ने २०१२ ते २०१९ दरम्याने वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याने २९ सामन्यांपैकी १९ सामने जिंकले आहेत.

6/8

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) चा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने २४ सामन्यांमध्ये १३ वेळा विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरला अजून कर्णधार म्हणून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत.

7/8

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने ३६ सामन्यांमध्ये नेतृत्व करत १७ सामने जिंकले आहेत.

8/8

केएल राहुल

केएल राहुल

आयपीएल २०२० साठी किंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने कधी कोणत्या टीमचं नेतृत्व केलेलं नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये पंजाबला पुढे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.