Photos: धोनी, धोनी, धोनी आणि धोनीच... मॅचच्या सुरुवातीपासून कोहलीच्या मिठीपर्यंत एकच जयघोष

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB: आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सहज जिंकला. 6 विकेट्स राखून चेन्नईने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यासाठी चाहत्यांनी मैदानात केलेल्या गर्दीमागील प्रमुख कारण होतं महेंद्रसिंह धोनी. जवळपास वर्षभराने धोनी मैदानात दिसला. थाला नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विशेष तयारी केल्याचं त्यांच्या हातातील पोस्टर्स आणि बॅनर्सवरुन दिसून आलं. पाहूयात असेच काही व्हायरल बॅनर्स आणि पोस्टर्स...

Swapnil Ghangale | Mar 23, 2024, 10:06 AM IST
1/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

अपेक्षेप्रमाणे चेन्नईच्या मैदानामध्ये आयपीएल 2024 चा पहिला सामना पाहण्यासाठी शुक्रवारी रात्री क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चेन्नईच्या संघाने चाहत्यांनी निराशा न करता विजयाने स्पर्धेला सुरुवात केली.  

2/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

साऊथ इंडियन डर्बी म्हणून चर्चेत राहिलेल्या या सामन्यात विजय चेन्नईने मिळवला. मात्र त्यापूर्वी सामन्यातील पहिल्याच इनिंगपासून मैदानात एकच चर्चा होती ती म्हणजे महेंद्रसिंह धोनीची. अगदी मैदानात एन्ट्री घेण्यापासून धोनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.  

3/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर धोनी पहिल्यांदाच मैदानात दिसून आला. मात्र कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याची क्रेझ थोडीही कमी झालेली नाही.  

4/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

मैदानात चेन्नईच्या समर्थनार्थ आलेल्या अनेक चाहते केवळ आणि केवळ धोनीचा खेळ पाहण्यासाठी आल्याचं हातातील पोस्टर्स आणि बॅनर्समधून सूचवत होते.  

5/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

थाला म्हणजेच आमच्या संघाचं नेतृत्व करणारा धोनी मैदानात परत आला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असा मजकूर लिहिलेले पोस्टर्सही अनेक चाहत्यांनी आणले होते.   

6/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

धोनीसाठीचं आमचं प्रेम हे कायमचं आहे, असा संदेश देणारेही अनेक बॅनर्स आणि पोस्टर्स मैदानात दिसून आले.  

7/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

धोनी हा केवळ खेळाडू नसून एक भावना असल्याचं मैदानावर दिसलेल्या या बॅनर्सचे फोटो शेअर करत चाहत्यांनी म्हटलं आहे.

8/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

यंदाचं आयपीएलचं पर्व हे धोनीचं शेवटचं पर्व असेल असं सांगितलं जात आहे. धोनीने कर्णधारपद ऋतुराजकडे सोपवणं हा याच निवृत्तीच्या योजनेचा एक भाग असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.  

9/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

अगदी सामना संपल्यानंतर धोनी आणि कोहलीने एकमेकांना मिठी मारतानाचा क्षणही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

10/10

Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB

धोनीला शेवटच्या काही सामन्यांमध्ये प्रत्यक्षात खेळताना पाहण्यासाठी चाहते मोठे गर्दी करतील असं सांगितलं जात आहे. पहिल्या सामन्यात तर नक्कीच धोनीची क्रेझ दिसून आली यात तिळमात्रही शंका नाही.