इंटर्न असून ऑफिससाठी रोज फ्लाइटने प्रवास, तरुणीची कहाणी सोशल मीडियावर Viral

Viral News : इंटर्न आणि तरीही ऑफिसला फ्लाइटने जाते. या तरुणीची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. 

Jun 20, 2023, 12:54 PM IST

Social Media Viral : महागाईमुळे दररोज बाइक आणि कारने दररोज ऑफिसला जायचा अनेक जण विचार करत नाही. मग ही तरुणी इंटर्न असून दररोज फ्लाइटने ऑफिसला जाते. कसं बरं...

1/15

फ्लाइटने इंटर्नशिपसाठी जाणाऱ्या तरुणीचं नाव आहे सोफिया सेलेन्टानो. ती 21 वर्षांची असून तिचा थाटच निराळा आहे. 

2/15

सोफिया ही अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये राहते. तर ती ओगिल्वी हेल्थ नावाच्या कंपनीत समर इंटर्नशिप करत आहे. 

3/15

या कंपनीचं ऑफिस न्यू जर्सीमध्ये आहे. घरभाडं वाचविण्यासाठी ही तरुणी दररोज ऑफिसला फ्लाइटने जाते. 

4/15

सोफिया ही प्रसिद्ध टिकटोकर आहे. फ्लाइटने इंटर्नशिपला जाण्याची माहिती तिने टिकटॉकवर दिली आहे. 

5/15

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिला फ्लाइट पकडण्यासाठी पहाटे तीन वाजता उठावं लागतं. 

6/15

ती पुढे म्हणाली की, तिला न्यू जर्सीच्या पारसिप्पनी परिसरात भाड्याने एकटं राहायचं नव्हतं. म्हणून ती हा निर्णय घेतला आहे.   

7/15

अनेकांना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेडी वाटते. रोज सकाळी उठून दिवसातून दोन वेळा मी विमान प्रवास करते. 

8/15

पण तिला हा वेडेपणा वाट नसून तिला फिरण्याची आवड असल्याने ती दररोज फ्लाइटचा प्रवास आनंदाने करते.   

9/15

ती पुढे असंही म्हणाली की, न्यू जर्सीमध्ये घर भाड्याने घेण्यापेक्षा घरातून प्रवास करणे तिच्यासाठी जास्त स्वस्त आहे. 

10/15

दक्षिण कॅरोलिना ते न्यू जर्सी हे अंतर हे 600 मैल आहे. तिला न्यू जर्सीच्या राउंड ट्रिप फ्लाइटसाठी $ 100 खर्च होतो. 

11/15

ती आठवड्यातून एक दिवस ऑफिसला जाते आणि जर तिला भाड्याने खोली घ्यायची असेल तर तिला दरमहा $3400 पेक्षा जास्त खर्च करावा लागेल.  

12/15

ही पद्धत मला भाड्याच्या खोलीत राहण्यापेक्षा स्वस्त वाटते. शिवाय यातून तिला जीवनशैलीसाठी स्वातंत्र्यही मिळतं. 

13/15

तिने या व्हिडीओमध्ये असंही सांगितलं आहे की, ती फ्लाइटने ऑफिसला जाणारी एकटीच नाही. वीक्स अटलांटाहून जॉर्जियाला एक व्यक्ती असाच ऑफिसला जातो.   

14/15

ती या प्रवासाठी बजेट-फ्रेंडली फ्लाइट स्पिरिट एअरलाइन्सची मदत घेते. सोफिया अपारंपरिक दृष्टिकोनाचे आर्थिक फायदे तिच्या या व्हिडीओमधून हायलाइट करत आहे. 

15/15

सोशल मीडियावरील तिच्या इन्स्टाग्रामवर ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.