भारतातील सर्वात लडखडत चालणारी ट्रेन; 5 राज्यं, 1910 किमीचा टप्पा, 111 स्थानकं अन् 37 तास; तरीही तिकिटासाठी मारामार

Indian Train with Most Stoppage: भारतीय ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. डोंगर, वाळवंटं, समुद्रावरील ब्रीजवरुन ते जम्मू काश्मीरपर्यंत अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. यातील काही ट्रेन प्रवासाचं अंतर कमी असतं, तर काहींच फार मोठं असतं.   

| Oct 15, 2024, 13:59 PM IST

Indian Train with Most Stoppage: भारतीय ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. डोंगर, वाळवंटं, समुद्रावरील ब्रीजवरुन ते जम्मू काश्मीरपर्यंत अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. यातील काही ट्रेन प्रवासाचं अंतर कमी असतं, तर काहींच फार मोठं असतं. 

 

1/7

Most Stoppage Train: भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. डोंगरापासून वाळवंटापर्यंत, समुद्राच्या किनाऱ्यापासून जम्मू-काश्मीरपर्यंत लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. काही ट्रेन कमी अंतराच्या तर काही लांब पल्ल्याच्या आहेत. काही ट्रेन नॉनस्टॉप तर काही गाड्या जवळपास प्रत्येक स्थानकावर थांबतात.   

2/7

पण आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत ती देशातील सर्वाधिक थांबे असलेली ट्रेन आहे. ही ट्रेन 37 तासांच्या प्रवासात 111 स्थानकांवर थांबते.   

3/7

भारतात एक अशी ट्रेन आहे जी सर्वात जास्त स्थानकांवर थांबते. पश्चिम बंगालच्या हावडापासून पंजाबच्या अमृतसरपर्यंत धावणारी हावडा-अमृतसर मेल सर्वाधिक स्थानकांवर थांबणारी एकमेव ट्रेन आहे.   

4/7

हावडा-अमृतसर मेल 10, 20 किंवा 30 नाही तर तब्बल 111 स्टेशनवर थांबून आपला प्रवास पूर्ण करते. ही ट्रेन हावडा ते अमृतसर दरम्यानचे 1910 किलोमीटरचे अंतर 37 तासांत कापते. प्रवासादरम्यान, ही ट्रेन वाटेत 111 वेळा स्थानकांवर थांबते.   

5/7

हावडा-अमृतसर मेल ही देशातील सर्वाधिक थांबे असलेली ट्रेन पाच राज्यांमधून जाते. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या मोठ्या शहरांमधून जाणारी ट्रेन 111 रेल्वे स्थानकांवर थांबते. थांबे असल्याने त्या भागातील लोकांना मोठा फायदा होतो. आसनसोल, पाटणा, वाराणसी, लखनौ, बरेली, अंबाला, लुधियाना आणि जालंधर या प्रसिद्ध स्थानकांवर त्याचे थांबे थोडे लांब आहेत, तर लहान स्थानकांवर थांबा फक्त 1 ते 2 मिनिटांचा आहे.  

6/7

हावडा-अमृतसर मेल ट्रेनचे वेळापत्रक असं ठेवण्यात आलं आहे की, जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. ही ट्रेन हावडा स्टेशनवरून संध्याकाळी 7:15 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 8:40 वाजता अमृतसरला पोहोचते. त्याचप्रमाणे ही गाडी अमृतसरहून सायंकाळी 6.25 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता हावडा स्थानकावर पोहोचते.  

7/7

सर्वाधिक थांबा घेणाऱ्या या ट्रेनचं भाडंही सामान्य आहे. हावडा-अमृतसर मेलचे स्लीपर क्लासचे तिकीट भाडे 695 रुपये, थर्ड एसी भाडे 1870 रुपये, सेकंड एसी भाडे 2755 रुपये आणि फर्स्ट एसी भाडे 4835 रुपये आहे.