हे खरंय! आता वेटिंग लिस्टची कटकट संपणार; Indian Railway चा प्रवाशांसाठी सुपर प्लॅन

Indian Railway : इथून पुढं मात्र रेल्वे विभागाच्या एका अभिनव उपक्रमामुळं ही अडचणही दूर होणार आहे. 

Aug 06, 2024, 13:58 PM IST

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे रेल्वेच्या Confirm तिकीटाचा. कारण अनेकदा रेल्वे आरक्षणासाठी काही मार्गांवर कितीही लवकर तिकीट काढलं तरीही ते कन्फर्म होईलच याची काही शाश्वती नाही. 

 

1/7

प्रवास

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

How to Book Confirm Train Ticket: भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दर दिवशी देशात जवळपास 2 कोटींहून अधिक नागरिक प्रवास करत अपेक्षित ठिकाणी पोहोचतात. 

2/7

आरक्षण

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

दर दिवशी हजारोंच्या संख्येनं विविध मार्गांवर रेल्वे धावतात. काही मार्गांवर तर रेल्वेला इतकी गर्दी असते की, तिकीटाचं आरक्षण कितीही लवकर करण्याचा प्रयत्न करुही Confirm Ticket मिळवणं शक्य होत नाही. 

3/7

आव्हानं

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

प्रवाशांपुढं येणारी ही आव्हानं कमी करण्यासाठी आता रेल्वेच्याच वतीनं एक सुपर प्लॅन तयार करण्यात आला आहे. जिथं अधिकाधिक प्रवाशांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे.   

4/7

प्रवाशांच्या सेवेत

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

प्राथमिक माहितीनुसार रेल्वेचा हा उपक्रम यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात काही निवडक मार्गांवर या प्लॅनची चाचणी करण्यात येणार असून, साधारण 90 टक्के प्रवासी याअंतर्गत कन्फर्म तिकीट मिळवण्यास पात्र असतील. 

5/7

सुपर अॅप

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

हा उपक्रम म्हणजे रेल्वेचं सुपर अॅप. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार असून, या माध्यमातून डेटा अॅनालिसिसच्या माध्यमातून रेल्वे तिकीटाची उपलब्धता वाढवता येणार आहे. 

6/7

प्रवाशांचा डेटा

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

500 किमी आणि त्याहून कमी अंतराच्या मार्गांवरील कन्फर्म तिकिटाच्या प्रवाशांचा डेटा आणि वेटिंग तिकिटांचा डेटा यांचं अॅनालिसिस करण्यात येणार असून, प्रवाशांची मागणी आणि आसनक्षमता यानुसार आरक्षणाची आकडेवारी निर्धारित केली जाईल.   

7/7

प्रयोग

Indian Railway waiting ticket tension soon to be solved with railway super app

2031 - 32 या वर्षांदरम्यान प्रवाशांमागं असणारी वेटिंग लिस्टची कटकट संपवण्यासाठी आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे विभागाकडून हे प्रयत्न करण्यात येत आहेत. तेव्हा आगा मागणी, पुरवठा आणि उपलब्धता या त्रिसूत्रीवर आधारित रेल्वेचा हा प्रयोग नेमका कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.