Waiting Ticket Rules: काऊंटरवरून वेटिंग तिकिट घेऊन रिझर्व्हेशन कोचमधून करता येतो प्रवास? रेल्वेचे 'हा' नियम ठेवा लक्षात

राज्यसभेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेटिंग तिकिटांविषयी विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. चला तर जाणून घेऊया की वेटिंग तिकिट असताना रिजर्व कोचमध्ये प्रवास करणं अनधिकृत आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं आहे की रेल्वेकडे अशा प्रवाशांची डिटेल नसते. 

| Dec 03, 2024, 16:51 PM IST
1/7

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेटिंग तिकिटांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी वेटिंग तिकिटांवर असलेल्या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं आहे. रिझर्व कोचमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करणं अनऑथराज्ड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी याशिवाय हे देखील सांगितलं की रेल्वेकडे अशा प्रवाशांची डिटेल नाही. 

2/7

वेटिंग तिकिटांसोबत रिजर्वेशन आणि एसी कोचमध्ये प्रवास करणं हे अनधिकृत आहे. रेल्वे मंत्री यांनी केलेल्या या वक्तव्यांनंतर लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित केला आहे की यामुळे रेल्वेनं प्रवास करणं कठीण होईल? काउंटरवरून घेतलेलं वेटिंग तिकिट अनधिकृत असेल का? अशाच काही प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया... 

3/7

रेल्वेच्या 2010 च्या सेक्युलरनुसार, रिझर्व्ह कोचमध्ये फक्त कंफर्म आणि आंशिक रुपात कन्फर्म ( RAC) सीट असलेले लोकचं प्रवास करु शकतात. याचा अर्थ जर तुमच्याकडे कन्फर्म तिकिट असेल तर तुम्ही वेटिंग तिकिट किंवा आरएसी असेल तरच प्रवास करु शकतात. 

4/7

IRCTC मधून वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या पॅसेंजर्सचं तिकिट हे ई तिकिटमधून ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. काउंटक वेटलिस्ट तिकट घेऊन सामान्य कोचमध्येच प्रवास करु शकतात. याचा अर्थ काउंटर वेटिंग तिकिट आणि सामान्य कोच तिकिटाचे प्रवासी एकाच डब्यातून प्रवास करु शकतात. 

5/7

दरम्यान, वेटिंग तिकिटांना घेऊन रेल्वेनं कोणत्याही नियमांमध्ये बदल केलेले नाही. जर तुम्ही वेटिंग तिकिट घेऊन रिझर्व कोचमध्ये चढत असाल तर अशात तुम्हाला टीसीनं पकडल्यानंतर जिथून ट्रेन जिथून सुरु झाली आहे तिथंपासून जे शेवटचं स्टेशन आहे, तिथपर्यंतचं तिकीटाचे पैसे आणि त्यासोबत 440 रुपये दंड आकारतील

6/7

त्याशिवाय टिसी त्यांना मध्येच कोणत्याही रेल्वे स्टेशनला उतरवू देखील शकतात. रेल्वेच्या 2010 च्या सर्कुलरनुसार, रिझर्व याचाच अर्थ स्लीपर कोचमध्ये फक्त कंफर्म आणि RAC तिकिटांसोबत प्रवास करु शकतात. 

7/7

रेल्वे तिकिटांमध्ये वेटिंग वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यात GNWL,  RLWL, PQWL, TQWL, RSWL, RAC हे टाईप आहेत.