'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या

Partners On Rent Trend: मग आता लग्न कधी करताय? किंवा विवाहित जोडप्याला आता गोड बातमी कधी? असे प्रश्न जवळपास प्रत्येक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमांमध्ये विचारले जातात. मात्र यावरच जालीम उपाय म्हणून चक्क भाड्याने जोडीदार घेण्याचा विचित्र ट्रेण्ड सुरु झाला आहे. नेमका हा ट्रेण्ड काय आहे पाहूयात...

| Dec 04, 2024, 09:35 AM IST
1/10

partnersonrent

जोडीदार भाड्याने घेण्याचा प्रकार या देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र यामागील कारण फारच विचित्र आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...

2/10

partnersonrent

लग्न असो, नोकरी असो किंवा मुलं होण्याचं वय असो सर्वांसाठी एक ठराविक आदर्श वयोमर्यादा समाजानेच घालून दिल्याचं पाहायला मिळतं. सध्या तिशी आणि चाळीशीत असलेल्या पिढीच्या पालकांनी या सर्व गोष्टी निमुटपणे फॉलो केल्या. मात्र आताची पिढी असं करेल असं नाही. याच कारणामुळे एका देशात आता तरुणाईकडून चक्क जोडीदार भाड्याने घेण्याचा प्रकार समोर आला आहे.  

3/10

partnersonrent

तरुण मुलामुलींवर त्यांच्या कुटुंबियांकडून लग्नाचं आणि लग्नानंतर आपलं कुटुंब असावं यासाठी मुलंबाळं व्हावीत या हेतूने एवढा दबाव टाकला जात आहे की त्याला विरोध करण्यासाठी आता हे तरुण, तरुणी चक्के जोडीदार भाडेतत्वावर घेत आहेत. 

4/10

partnersonrent

कुटुंबाकडून सातत्याने लग्नासाठी आणला जाणारा दबाव आणि लग्न कधी करणार? या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी आशियामधील एका देशातील तरुणाईने जोडीदार भाडेतत्वावर घेण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला आहे.

5/10

partnersonrent

भाड्याने मिळणाऱ्या जोडीदारांची मागणी एवढी वाढली आहे की यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. एकाद्या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावताना लग्न केलं का? कधी करणार यासारख्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी अविवाहित व्यक्ती अशा भाडे तत्वावर मिळणाऱ्या जोडीदाराला काही तासांचे पैसे देऊन त्या कार्यक्रमाला खराखुरा जोडीदार म्हणून सोबत घेऊन जाते.   

6/10

partnersonrent

अशा भाड्याच्या जोडीदारांबरोबर होणाऱ्या करारांमध्ये खरोखर प्रेमात पडायचं नाही, लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत, एकमेकांवर कशासाठी दबाव टाकायचा नाही अशा अटी असतात, असं व्हीएनएक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

7/10

partnersonrent

आता हा असला उद्योग कोणत्या देशात केले जातात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम! हा देश मागील काही काळापासून स्वस्त पर्यटनासाठी भारतीयांच्या फेव्हरेट फॉरेन डेस्टीनेशन्सपैकी एक आहे. 

8/10

partnersonrent

व्हिएतनाममधील सामाजिक जीवनामध्ये लग्न होणे ही फार मोठी गोष्ट मानली जाते. मुलांच्या लग्नाची चिंता येथील पालकांना असते. मूल विवाहित आहे की अविवाहित यावर ते अपयशी आहेत की यशस्वी हे ठरवलं जातं. तसेच आपल्या नातवडांचं संगोपन करण्यासाठी आजी-आजोबा सक्षम असेपर्यंत मुलांना आपत्य झालं पाहिजे असा दबावही टाकला जातो.  

9/10

partnersonrent

याच तणावापासून दूर राहण्यासाठी व्हिएतनाममधील तरुणाईने आता भाड्याने जोडीदार घेण्याचा ट्रेण्ड सुरु केला आहे. सध्या तरी ही पळवाट असली तरी याचा फायदा अनेकांना होताना दिसत आहे.   

10/10

partnersonrent

मात्र दुसरीकडे या तरुण-तरुणींच्या घरी भाड्याने घेतलेल्या जोडीदारासंदर्भातील सत्य समोर आल्यावर कुटुंबातील सर्वात कर्त्या सदस्यावरील विश्वास उडण्याची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच याला कायदेशीर मान्यता नसल्याने महिलांनी सावध राहण्याची गरज असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. सौजन्य - रॉयटर्स)