कोरोनाला रोखण्यासाठी भारतातील ५६० जिल्ह्यात लॉकडाऊन
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
देशभरात 560 जिल्हे लॉकडाऊन आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 492वर पोहचली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देशातील, राज्यातील अनेक सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक सीमांवर पोलीस तैनात करण्यात आले असून देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सरकारकडून लोकांना गरज नसल्या घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय.