PHOTO: चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन

Chandrayaan 3 : भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन  केले. चांद्रयान-3 चा विक्रम लँडरमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होणार आहे. जाणून घेऊया चांद्रयान-3 बाबतची सर्वात मोठी अपडेट. 

| Jul 03, 2024, 18:09 PM IST
1/8

 विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  अत्यंत महत्वाचा डेटा गोळा आहे. भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केलेले हे जगातील सर्वात मोठे संशोधन मानले जात आहे.   

2/8

 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा चंद्रावर दिवस होता. 14 दिवस चांद्रयान-3 ने यशस्वी संशोधन केले. मात्र, 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान चंद्रावर रात्र झाल्याने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर  स्लीपमोडवर ठेवण्यात आले. यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले नाहीत. 

3/8

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. 

4/8

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने गोळा केलेल्या डेटाचे नविन विश्लेषण समोर आले आहे. त्यामुळे चंद्र जवळून समजून घेण्यास शास्त्रज्ञांना खूप मदत होणार आहे.  तसेच चंद्राची निर्मिती नेमकी कशी झाली याचा देखील उलगडा होणार आहे. 

5/8

या ठिकाणी प्रग्यानला लहान खडकांचे तुकडे मिळाले आहेत. यांची लांबी एक सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर आहे.  शिवशक्ती पॉइंटच्या पश्चिमेला सुमारे दहा मीटर व्यासाचा खड्डा देखील आढळला आहे. 

6/8

चांद्रयान-3 चंद्रावर  ज्या ठिकाणी लँड झाले त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव प्वाइंट नाव दिले आहे. प्रग्यान रोवर शिवशक्ती प्वाइंटच्या 39 मीटर पुढे प्रवास केला.

7/8

प्रग्यान रोवरने चंद्राच्या पुष्ठभागावरील जवळपास 103 मीटर आंतर कापले. रोवर मॅन्जिनस आणि बोगुस्लावस्की क्रेटर दरम्यानचे हे अंतर आहे. 

8/8

चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे.