सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक असलेले भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन; हाताच्या बोटावर मोजता येणार नाही संख्या

भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहे ते जाणून घेऊया. 

Feb 18, 2025, 17:13 PM IST

India Biggest Railway Station: देशभर भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. देशाचा कानाकोपरा हा रेल्वेने जोडला गेला आहे. भारतात अनेक लहान मोठे रेल्वे स्टेशन आहेत. सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक असलेले भारतातील रेल्वे स्थानक कोणते? इथं इतके प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहेत की हाताच्या बोटावर याची संख्या मोजता येणार नाही. 

1/7

रेल्वे नेटवर्कमध्ये भारत देश हा जगात चौथ्यास्थानावर आहे. भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे जिथे एकावेळेला 23 ट्रेन थांबतात. भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक याच रेल्वे स्थानकात आहेत.   

2/7

 हावडा रेल्वे जंक्शन हे भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.   1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने  पश्चिम बंगालमधील हावडा शहरात हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे स्टेशन बांधले.   

3/7

हावडा रेल्वे जंक्शन हे स्टेशन भारतातील सर्वाक व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. 24 तासात या रेल्वे स्थानाकतून 600 पेक्षा अधिक ट्रेन थांबतात.

4/7

 हावडा रेल्वे जंक्शनवर 26 रेल्वे ट्रॅक आहेत. तर, या स्टेशनवरुन एकावेळी 23 ट्रेन थांबतात. 10 लाखांपेक्षा अधिक प्रवासी करतात.   

5/7

 हावडा रेल्वे जंक्शनवरुन भारताच्या कानाकोपऱ्यात ट्रेन जातात. इतकचं नाही तर परदेशात जाण्यासाठी देखील  हावडा रेल्वे स्टेशनवरुन ट्रेन मिळते.   

6/7

हावडा रेल्वे जंक्शन असे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.  हावडा रेल्वे जंक्शन हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे.   

7/7

भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन दिल्ली किंवा मुंबईमध्ये नाही तर  पश्चिम बंगालमध्ये आहे.