IND vs SL: हे फक्त Virat Kohli चं करू शकतो, एकाच दिवशी ठोकली 4 शतकं

विराट कोहलीने आज पुन्हा एकदा त्याचा उत्तम खेळ दाखवला. श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने शतक ठोकलं. हे त्याचं 46 वं वनडे शतक होतं.

Jan 15, 2023, 22:56 PM IST
1/5

आज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सिरीजमधील दुसरं शतक झळकावलं असून कोहलीचं हे 74 वं आंतरराष्ट्रीय शतक आहे.

2/5

या खेळीसह आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट केलीये. कोहलीने एकाच दिवसात चौथं आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.  15 जानेवारीला कोहलीने चौथ्यांदा शतक झळकावलंय.

3/5

यापूर्वी त्याने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे सामन्यात 122 रन्स केलेले. तर 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सामन्यात 153 रन्सची खेळी केली होती.

4/5

2019 मध्ये 15 जानेवारीला देखील कोहलीची शतक झळकावलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 रन्सची उत्तम इनिंग खेळली होती.

5/5

तर आज कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 43व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर सिंग रन घेत 46 वं वनडे शतक पूर्ण केलंय.