IND vs SL : हार्दिक पांड्या की केएल राहुल? श्रीलंका दौऱ्यात कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?

Sri lanka vs India Series : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्या करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल (Ind vs SL series Schedule) जाहीर केलं. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. 

Saurabh Talekar | Jul 14, 2024, 19:23 PM IST
1/5

टी-20 मालिका

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला टी-20 सामना 27 जुलै, दुसरा टी-20 सामना 28 जुलै आणि तिसरा सामना 30 जुलैला रंगणार आहे. 

2/5

एकदिवसीय मालिका

एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टला सुरू होईल. पहिला वनडे सामना 2 ऑगस्ट रोजी होईल. तर दुसरा एकदिवसीय सामना 4 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. तर तिसरा सामना 7 ऑगस्टला असेल.

3/5

श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल

बीसीसीआयने टीम इंडियाचं श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल जाहीर केलं असलं तरी अद्याप टी-ट्वेंटी आणि वनडेसाठी कॅप्टन कोण असेल? यावर कोणतीही माहिती समोर आली नाही. 

4/5

हार्दिक पांड्या vs केएल राहुल

टीम इंडियाची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याला दिली जाणार की केएल राहुलला? यावर अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, या दोघांना टी-ट्वेंटी आणि वनडेची कॅप्टन्सी अनुक्रमे दिली जाईल, अशी शक्यता आहे.

5/5

उत्सुकता शिगेला

दरम्यान, भारत आणि श्रीलंकादरम्यानचे टी20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.