सावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून

 आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया. 

| May 03, 2024, 18:48 PM IST

Ice Cream vs Frozen Dessert: आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया. 

1/9

सावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही; फरक घ्या समजून

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

Ice Cream vs Frozen Dessert: उन्हाळ्यात आपल्याला जास्त थंड पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी आईस्क्रीमला सर्वात जास्त मागणी असते. पण तुम्ही खात असलेले बहुतांश आईस्क्रीम हे आईस्क्रीम नसून फ्रोजन डेझर्ट असतात हे तुम्हाला माहिती आहे का? 

2/9

लोकांचा गोंधळ

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया. 

3/9

आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टमध्ये फरक

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

आईस्क्रीम दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांपासून बनलेला असतो. यामध्ये दूध किंवा मलई, अंडी, साखर, व्हॅनिला सार आणि इतर फ्लेवरिंग्जचे मिश्रण असते. हे मिश्रण मऊ आणि क्रीमी करुन आइस्क्रीम बनतो.

4/9

लगेच खाणे अपेक्षित

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

फ्रोझन डेझर्ट हा दिसायला आईस्क्रीमसारखेच दिसतात. पण यामध्ये वनस्पती तेल, मैदा आणि साखरेचा वापर केला जातो.  फ्रोझन डेझर्ट बहुतेकदा थंड केले जातात आणि फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर लगेच खाणे अपेक्षित असते. 

5/9

कमी फॅट आणि कार्ब

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

आईस्क्रीममध्ये फ्रोझन डेझर्टपेक्षा कमी फॅट आणि कार्ब असतात. आईस्क्रीमच्या प्रति 100 ग्रॅममध्ये 5.6 ग्रॅम इतके फॅट असते तर फ्रोझन डेझर्टमध्ये याचे प्रमाण 10.56 ग्रॅम फॅट इतके असते.

6/9

आईस्क्रीम म्हणून विकण्यास मनाई

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

भारतीय खाद्य कायद्यानुसार फ्रोझन डेझर्ट हे आईस्क्रीम म्हणून विकण्यास मनाई आहे. तरीही देशातील अनेक मोठ्या आईस्क्रीम विक्रेत्या कंपन्या त्याची आईस्क्रीम म्हणून विक्री करतात.

7/9

रकरणी तुम्हाला काहीच फरक नाही

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टमध्ये वरकरणी तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही.  पण दोन्ही एकमेकांपासून भिन्न आहेत. आईस्क्रीम दूध-आधारित उत्पादनापासून तर फ्रोझन डेझर्ट हे वनस्पती तेलापासून बनविले जाते.

8/9

बॉक्सचे लेबल तपासा

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

आईस्क्रीम खरेदी करण्यापुर्वी बॉक्सचे लेबल तपासा. पॅकेजवर काय लिहिलंय हे वाचायला विसरु नका.  असे केल्यास आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समधील फरक तुम्ही सहज ओळखू शकाल.

9/9

डॉक्टरांचा सल्ला

Ice Cream vs Frozen Dessert  mistaking frozen dessert for ice cream Health Tips Marathi News

कुल्फी आणि फ्रोझन डेझर्टमध्ये साखर आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे याचे सेवन कधीही कमी प्रमाणात करावे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांनी फ्रोजन डेझर्ट खाताना सावध असले पाहिजे. ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.