Axar Patel: 'मी कॉफी पित होतो तेवढ्यात...', विजयानंतर अक्षरने सांगितला ड्रेसिंग रूममधील किस्सा!

 Axar Patel tells dressing room story: अक्षरने मोक्याच्या क्षणी 34 धावा केल्या तर दुसरीकडे 4 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा देत 2 विकेट काढल्या. विजयानंतर त्याला प्लेयर ऑफ द मॅच (Player of the Match) घोषित करण्यात आलं. त्यावेळी त्याने ड्रेसिंगरूम मधील किस्सा सांगितला.

Apr 25, 2023, 00:22 AM IST

Axar Patel, SRH vs DC:  आयपीएलच्या (IPL 2023) 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला एका रोमांचक सामन्यात पराभूत केलं. त्यांच्या घरच्या मैदानावर हैदराबादला पराभव स्विकारावा लागला. तर दुसरीकडे दिल्लीच्या अक्षर पटेलने (Axar Patel) अष्टपैलू खेळी केली आणि विजय दिल्लीच्या पारड्यात खेचून आणला. अक्षरने मोक्याच्या क्षणी 34 धावा केल्या तर दुसरीकडे 4 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा देत 2 विकेट काढल्या. विजयानंतर त्याला प्लेयर ऑफ द मॅच (Player of the Match) घोषित करण्यात आलं. त्यावेळी त्याने ड्रेसिंगरूम मधील किस्सा सांगितला.

 

1/5

अधिक आनंद कशाने झाला, फलंदाजी की गोलंदाजी? असा सवाल त्याला विचारला गेला. त्यावर गोलंदाजी, असं उत्तर अक्षरने दिलं. 

2/5

मी 34 मध्ये 34 धावा केल्या, त्यामुळे दोन विकेट अधिक महत्त्वाच्या होत्या, असं अक्षर (Axar Patel) म्हणाला आहे.

3/5

मी पिण्यासाठी कॉफी ऑर्डर दिली आणि एका षटकात तीन विकेट पडल्यावर मी ग्लास तसाच सोडला, असा किस्सा अक्षर पटेल (Axar Patel) याने विजयानंतर सांगितला.

4/5

मी आणि मनिष पांडेने चर्चा केली की आपण ते शक्य तितक्या खोलवर सामना खेचला पाहिजे, असं म्हणत अक्षरने विजयाचं (SRH vs DC) रहस्य उलघडलं.

5/5

दरम्यान, मी बॅटर्सवर नॉकिंगच्या स्वरूपात विकेट्स मिळवत राहिलो, परंतु स्लो बॉलवर विकेट मिळवणं आनंददायक असतं, असं अक्षर (Axar Patel) म्हणतो.