Skin care Tips : चेहऱ्यावर ब्युटी प्रोडक्ट लावण्यापूर्वी वाचा ही बातमी!
Fruits For Glowing Skin : काही लोकांना सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावताना खूप काळजी घ्यावी लागते. तर काहीजणांना कोणतेही केमिकल्स असलेले स्किनकेअर प्रोडक्ट चालत नाहीत. अशावेळी काहीजण घरच्या घरी नैसर्गिक घटकांसह स्किनकेअर करणे पसंत करतात. जर तुम्हाला पण फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करून तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही फळांचा वापर करुवही त्वचेची काळजी घेऊ शकता.
1/6
डाळिंब

डाळिंबाचे सौंदर्यवर्धनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चेहऱ्यावरील पिकलेले पिंपल्स नियमितपणे चोळल्यास त्वचेचा रंग हलका आणि गुलबट होण्यास मदत होते. याचा प्रयोग तुम्ही ओठांवरही करु शकता. चेहऱ्यावरील डाग आणि झाकोळलेपणा घालविण्यासाठी डाळिंबांची स्वच्छ धुतलेली साल कच्च्या दुधात वाटा व चेहरा, मान, गळा यावर लेप लावा. लेप सुकल्यानंतर 15 मिनिटांनी धुवा.
2/6
आंबा

अ, ब आणि के ही तीनच जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. उन्हाळ्यातील उष्णता टाळण्यासाठी कच्चे पन्हे प्यावे किंवा ताजे मँगो मिल्कशेक प्या. चेहऱ्याची त्वचा उजळते, यासाठी आंब्याचा गर, हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तसेच कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा व मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होईल.
3/6
अननस

अननसाचे अगदी एक काप तुमच्यासाठी पुरेसे आहे. जर तुम्ही घरीच अननास सोलत असाल तर अननासाच्या कडा टाकून देऊ नका. कारण त्याचा वापर तुम्हाला स्किनकेअरमध्ये वापरता येईल. अननसात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जेव्हा त्वचेच्या खोलवर जाऊन त्वचा खुलवतेय तेव्हा आम्लयुक्त घटक चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. अननस कोणत्याही त्वचेसाठी फायदेशीर आहे.
4/6
केळी

बारमाही मिळणारे फळ पोटाच्या आरोग्यापासून ते अनेक गोष्टींसाठी चांगले असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते. हे दोन्ही गुणधर्म केसांच्या आणि त्वचेसाठी चांगले आहेत. जर एखादे केळं जास्त पिकले असेल तर तुम्ही खाणार नसाल तर ते केळं कुस्करून त्यात काहीही न टाकता चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. केळीचा अर्क चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे ठेवा. त्यानंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा.
5/6
पपई

6/6
कलिंगड
