वारी चुकायाची नाही! कमी खर्चात आणि वेळात पंढरपूरला कसं पोहोचायचं?

| Jul 04, 2024, 13:09 PM IST

How to Reach Pandharpur: आषाढी जवळ आली तसे अनेकजण कमी खर्चात आणि कमी वेळेत पंढरपूरला कसे पोहोचायचे? याची माहिती गोळा करत आहेत. तुम्हीदेखील किंवा तुमच्या ओळखीत कोणी पंढरपूरला जाऊ इच्छित असेल तर पुढील माहिती जाणून घ्या. 

1/8

वारी चुकायाची नाही! कमी खर्चात आणि वेळात पंढरपुरला कसं पोहोचायचं?

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

How to Reach Pandharpur: पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. वारी चुकायची नाही, असे म्हणत दरवर्षी वारकरी पायी पंढरपुरला जातात. 

2/8

विकेंडला जायचंय

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

पण असे अनेकजण आहेत. ज्यांना वारीत सहभागी व्हायचंय, पंढरपूरला जायचंय.. पण कामधंद्यामुळे ते शक्य होतं नाहीय. असं असलं तरी ते मनाने वारीत चालतायत. सुट्टी मिळायची वाट पाहतायत..

3/8

वारीत एक दिवस तरी

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

काही जणांनी वारी कधीच पाहिली नाही पण त्यांना वारीत एक दिवस तरी चालायचंय..आषाढीला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय. पण लवकर कसं पोहोचता येईल हे अनेकांना माहिती नसतं. 

4/8

कमी खर्चात आणि कमी वेळेत

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

आषाढी जवळ आली तसे अनेकजण कमी खर्चात आणि कमी वेळेत पंढरपूरला कसे पोहोचायचे? याची माहिती गोळा करत आहेत. तुम्हीदेखील किंवा तुमच्या ओळखीत कोणी पंढरपूरला जाऊ इच्छित असेल तर पुढील माहिती जाणून घ्या. 

5/8

भीमा नदीच्या काठावर

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

पंढरपूर तीर्थक्षेत्राची महती सर्वदूर पसरली आहे. पंढरी हे पंढरपूरचे दुसरे नाव असून येथे विठ्ठलाचे जगप्रसिद्ध मंदिर पाहायला मिळते. 

6/8

रेल्वेने कसं जायचं?

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनमधून तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता.  मुंबई आणि लातूरहून पंढरपूरला जाण्यासाठी अनेक रेल्वे आहेत. मुंबई एक्सप्रेस (18032), लातूर एक्सप्रेस (22108) , हुसेनसागर एक्सप्रेस ( 12702)     आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस ( 12116) या गाड्या नियमित पंढरपूरला जातात. पंढरपूरहून मुंबई, पुण्याला यायला तुम्हाला ट्रेन उपलब्ध असतात. 

7/8

रस्ते मार्गाने कसं जायचं?

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

रेल्वे स्थानक दूर असेल किंवा तुम्हाला रस्ते मार्गाने प्रवास करायचा असेल तर बसचा प्रवास स्वस्तात पडू शकतो. यासाठी मुंबई-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, उस्मानाबाद-पंढरपूर या बसेस नियमित असतात. आषाढीच्या काळात एसटी मंडळाकडून जादा बसेसही सोडण्यात येतात. परत येतानादेखील तुम्हाला बसचा प्रवास सोयीचा पडू शकतो. 

8/8

हवाईमार्गे

How to Reach Pandharpur via Train Bus or Road vithu mauli wari marathi News

आता रेल्वे, रस्ते मार्गासोबत हवाई मार्गानेदेखील तुम्ही पंढरपुरात पोहोचू शकता. पुणे आणि सोलापूरही पंढरपूरपासून जवळ असलेली विमानतळ आहेत. येथे पोहोचून तुम्ही रस्ते मार्गे पंढरपुरात जाऊ शकता.