अपघातानंतर अजून किती दिवस बोलू शकणार नाही Mayank Agarwal? समोर आले हेल्थ अपडेट

Mayank Agarwal: अगरतळ्याहून निघताना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून मयंक पाणी समजून एक पेय प्यायला. ते प्यायल्यानंतर त्याची तब्येत खालावली. 

Surabhi Jagdish | Feb 01, 2024, 12:31 PM IST
1/7

टीम इंडियाचा खेळाडू मयंक अग्रवालची तब्येत 2 दिवसांपूर्वी बिघडली होती. 

2/7

आगरतळ्याहून परतत असताना विमानात पाणी समजून वेगळ पेय प्यायल्याने मयमंकला त्रास होऊ लागला. त्याच्या तोंडात जळजळ झाली आणि उलट्याही होऊ लागल्या.

3/7

यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता त्याच्या तब्येतीबाबत अपडेट आलं आहे. 

4/7

मिळालेल्या माहितीनुसार, मयंकच्या तोंडात अजूनही सूज असून व्रण दिसून येत आहेत.

5/7

टीम मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, मयंकच्या तोंडात अजूनही फोड आलेत. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरूनही एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या तोंडावरील सूज स्पष्ट दिसत होती.

6/7

तोंडाला सूज आल्याने मयंक अजून 48 तास म्हणजेच दोन दिवस तरी बोलू शकणार नसल्याची माहिती मॅनेजरने दिली आहे.

7/7

दरम्यान या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.