मुंबईकरांची पावसाने उडवली दैना; रेल्वे ठप्प, वाहतूक कोंडी अन्...; पाहा धडकी भरवणारे PHOTO

मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. सखल भागात पाणी साचले आहे. तर, रेल्वे रूळांवरही पाणी साचले आहे. त्यामुळं लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. 

Mansi kshirsagar | Jul 08, 2024, 11:56 AM IST

Mumbai Rain Alert: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. सखल भागात पाणी साचले आहे. तर, रेल्वे रूळांवरही पाणी साचले आहे. त्यामुळं लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. 

1/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान मुंबईत 300 MM पाऊस कोसळला आहे. त्यामुळं अनेक भागात पाणी साचले आहे. 

2/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

रात्रभर कोसळणार्या पावसामुळं पहाटे भांडुप रेल्वे स्थानकातील स्थिती काहीशी अशी होती 

3/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल ते वाशी लोकल सुरू, मात्र वाशी ते सीएसएमटीलोकल सेवा ठप्प आहे. वाशी रेल्वे स्थानकात मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी

4/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

अंधेरी सबवे मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

5/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

पहाटेपासून ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. मात्र आता पाणी ओसरल्यामुळं हळहळू लोकलसेवा पूर्वपदावर येत आहे. त्यामुळं प्रवाशांनी स्थानकात लोकल पकडण्यासाठी एकच गर्दी केली होती. 

6/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने डोंबिवली स्थानकातील चित्र काहीसे असे होते

7/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

ईस्टर्न एक्सप्रेस हाय वेवर सायन चुनाभट्टी दरम्यान पाणी साचल्याने एकेरी वाहतूक होती. ठाणे,नवी मुंबई कडे जाणाऱ्या लेन वर पाणी साचले होते.

8/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतोय. महामार्गावर विलेपार्ले येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

9/9

Heavy Rain In Mumbai Suburbs Water Logging Railway Tracks Photos

पावसाच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने सुखरुप सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.