Health Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत
Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.
Best Way To Eat Onion: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घेतली पाहिजे. (Health Tips) कांद्यामध्ये व्हिनेगर मिसळल्यास ते शरीरासाठी दुप्पट फायदेशीर ठरु शकते. अशा कांद्याचे सेवन हृदयापासून ते पचनाच्या समस्यांपर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर ठरते. व्हिनेगर केलेल्या कांद्यामध्ये जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखे खनिजे असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. व्हिनेगरमध्ये बुडवलेल्या कांद्यामध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.





