आरोग्यासाठी 'या' 4 भाकऱ्या खूपच पौष्टिक, पण कोणी खावी व कोणी टाळावी?
रोजचा ऑफिसचा किंवा शाळेचा डब्बा असल्याने जेवणातही चपात्या असतात. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्वी चपात्याऐवजी भाकरी खाल्ल्या जात होत्या. मात्र आता ती जागा गव्हाच्या चपात्याने घेतली. पण भाकरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
Mansi kshirsagar
| Jan 31, 2024, 17:19 PM IST
Bhakri For Good Health: रोजचा ऑफिसचा किंवा शाळेचा डब्बा असल्याने जेवणातही चपात्या असतात. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्वी चपात्याऐवजी भाकरी खाल्ल्या जात होत्या. मात्र आता ती जागा गव्हाच्या चपात्याने घेतली. पण भाकरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
1/7
आरोग्यासाठी 'या' 4 भाकऱ्या खूपच पौष्टिक, पण कोणी खावी व कोणी टाळावी?
2/7
गहू हा पित्तकारी
3/7
ज्वारीची भाकरी
गहूपेक्षा ज्वारीची भाकरी अधिक पौष्टिक असते. कॅलरी कमी, ग्लुटेन मुक्त आणि भरपूर फायबर असल्यामुळं ज्यांना ग्लुटेनची अॅलर्जी आहे. त्यांच्यासाठी ही भाकरी उत्तम पर्याय आहे. वजन नियंत्रीत ठेवण्यासही उपयोगी आहे. कोणी खाऊ नये- ज्या लोकांना ऑक्सलेट किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी मात्र ज्वारीची भाकरी खाऊ नये.
4/7
बाजरीची भाकरी
बाजरीची भाकरी पौष्टक असून फायबरचे प्रमाण जास्त असते. या भाकरीच्या सेवनामुळं शरीरात जास्त प्रमाणात उर्जा उत्पन्न करते. त्यामुळं कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी ही भाकरी खूप पौष्टिक आहे. तसंच पचनासही मदत होते. कोणी खाऊ नये- ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी कमी प्रमाणात बाजरीच्या भाकरीचे सेवन करावी.
5/7
नाचणीची भाकरी
6/7