दुधासोबत 'या' डाळीचे सेवन केल्यास वाढतो हृदयविकाराचा धोका!

निरोगी आरोग्यासाठी दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही पदार्थांसोबत दूध पिणे टाळावे. 

Mansi kshirsagar | Oct 03, 2023, 18:14 PM IST

Health Alert In Marathi: निरोगी आरोग्यासाठी दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही पदार्थांसोबत दूध पिणे टाळावे. 

1/7

दूधासोबत 'या' डाळीचे सेवन केल्यास वाढतो हृदयविकाराचा धोका!

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

दुधात असलेले कॅल्शियम आणि पोषक तत्वे शरीरासाठी गरजेची असतात. हाडांना बळकटी येण्यासाठी दूध पिणे अत्यंत आवश्यक असते. रोज एक ग्लास दूधाचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून धोका कमी होतो. मात्र, दूधासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे

2/7

आरोग्यावर विपरीत परिणाम

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

 लहान मुलांबरोबरच मोठ्यांनीही आहारात दुधाचा समावेश करायला हवा. मात्र काही पदार्थांसोबत दुधाचे सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. असे कोणते पदार्थ आहेत हे जाणून घेऊयात. 

3/7

उडीद डाळ आणि दूध

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

आयुर्वेदानुसार उडीद डाळ आणि दूध कधीच एकत्र खाऊ नये. कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो त्यामुळं हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. 

4/7

पाचनक्रिया बिघडते

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

उडीद डाळ आणि दूध एकत्र किंवा थोड्या वेळाने सेवन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळं पाचनक्रिया बिघडते, मळमळ, उलट्या होणे, शरीरात जडपणा जाणवणे, पोटदुखी अशी लक्षणे जाणवतात.   

5/7

दोन तासांनी दूध प्यावे

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

उडीद डाळ खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनी दूध प्यावे. 

6/7

पचनाचा त्रास

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

उडीद डाळीबरोबर, दही आणि दूध आणि लिंबूवर्गीय  फळांसह दूध पिणे, मासे खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. त्यामुळं पचनाचा त्रास जाणवून शकतो. 

7/7

Disclaimer

Health Alert in marathi can we drink milk after eating urad dal

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)