H3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?
H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे. या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.
1/6
H3N2 विषाणूचा धोका

2/6
या वर्षातील मुलांना त्रास

3/6
H3N2 संसर्ग कसा ओळखावा?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, सर्दी, नाकातून वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 विषाणूची लक्षणे असू शकतात. याशिवाय काही मुलांमध्ये जुलाब, उलट्या यासारख्या जठरासंबंधी समस्याही डॉक्टरांनी पाहिल्या आहेत. ताप काही दिवसात कमी होतो, पण खोकला वाढतच जातो. हा संसर्ग 8 ते 10 दिवस त्रास देऊ शकतो.
4/6
कोणत्या मुलांना जास्त धोका आहे?

ज्या मुलांना दम्याचा त्रास किंवा लठ्ठपणा आहे, न्यूरोलॉजिकल आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आहेत त्यांना H3N2 संसर्गाचा धोका वाढतो. आतापर्यंत लागण झालेल्या सर्व मुलांना बरे होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागल्याचेही आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. 5 वर्षांखालील मुले ज्यांना दमा, मधुमेह, हृदयविकार, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्यांच्या पालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
5/6
सतर्क राहण्याची गरज कधी आहे?

6/6
H3N2 पासून कसे टाळावे?
