Guru Pushya Yoga 2023 : गुरुवारी गुरु पुष्य अमृत योगासह 5 शुभ योग!धनसमृद्धीसाठी 'या' वस्तू खरेदी नक्की करा

Guru Pushya Yoga 2023 shubh muhurat : गुरुवारी गुरु पुष्य योगाच्या शुभ मुहूर्तापासून 5 शुभ योगाबद्दल जाणून घ्या एका क्लिवकवर..

May 24, 2023, 15:51 PM IST

Guru Pushya Nakshatra 2023 : गुरुवारी अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. गुरु पुष्य अमृत योगासह 5 शुभ योग आहेत. अशा शुभ मुहूर्तावर धनसमृद्धी आणि प्रगतीसाठी काही वस्तूंची नक्की खरेदी करा. (guru pushya yoga 2023 amrit siddhi yoga muhurat and pushya nakshatra buy gold bike car and property)

1/12

गुरु पुष्यासह 5 शुभ योग!

गुरुवारी म्हणजे 25 मे 2023 ला गुरु पुष्य योगासह 5 शुभ योग जुळून आले आहेत.गुरु पुष्य अमृत योगासोबतच वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग जुळून आला आहे. 

2/12

संपत्तीसाठी 'या' वस्तू खरेदी करा!

गुरुवारी 25 मे 2023 ला कोणतेही शुभ कार्य कराल तर त्यात घवघवीत यश मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लग्नविधी सोडून इतर सर्व शुभ कामासाठी गुरु पुष्यचा दिवस शुभ आहे. 

3/12

गुरु पुष्य योग

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्लभ गुरु पुष्य योग तयार होतो. गुरु पुष्य योगाला गुरु पुष्य नक्षत्र योग असेही म्हणतात. हा योग अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. 

4/12

गुरु पुष्य योग 2023 मुहूर्त

गुरु पुष्य योग गुरुवारी सूर्योदयापासून संध्याकाळी 05:54 पर्यंत आहे. या दिवशी संध्याकाळी 05:54 पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होईल. 25 मे 2023 ला सकाळपासून 05:54 वाजेपर्यंत तुम्ही शुभ वस्तूंची खरेदी करावीत. 

5/12

इतर योगांचा मुहूर्त

25 मे 2023 ला वृद्धी योग संध्याकाळी 06:00 ते 08:00 पर्यंत असणार आहे. तर अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील सकाळी 05.26 ते संध्याकाळी 05.54 पर्यंत असेल. 

6/12

इतर योगांचा मुहूर्त

25 मे 2023 ला रवियोग सकाळी 05:26 ते सायंकाळी 05:54 पर्यंत असणार आहे. त्यानंतर रात्री 09.12 ते दुसऱ्या दिवशी 26 मे 2023 ला सकाळी 05.25 पर्यंत असेल. 

7/12

सोने

सोने हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर गुरु पुष्य योगात सोने खरेदी केल्याने तुमची संपत्तीत वाढ होते असं म्हणतात. 

8/12

हळद

गुरु पुष्य योगात हळद खरेदी करणे देखील अतिशय शुभ आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही हळद खरेदी करा. 

9/12

हरभरा डाळ

गुरु पुष्य योगात तुम्ही हरभरा डाळ खरेदी करु शकता. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते. हळद आणि हरभरा डाळ याशिवाय पिवळ्या रंगाचे कपडे, पितळ, तूप इत्यादी पैकी काही खरेदी करु शकता. 

10/12

नाणे

गुरु पुष्य योगाच्या दिवशी व्यक्तीने सोन्याचे नाणे किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते. 

11/12

धार्मिक पुस्तकं

गुरु पुष्य योगामध्ये देव गुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे यादिवशी तुम्ही धार्मिक पुस्तकांची खरेदी करणे शुभ मानले जाते.   

12/12

वाहन आणि मालमत्ता

वाहन आणि मालमत्ता खरेदी करणेदेखील या दिवशी शुभ मानली जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)