RR vs GT: अफगाणी जोडीसमोर राजस्थानचा खुर्दा; पराभवानंतर संजूचा चेहराच उतरला, म्हणतो...

आयपीएल 2023 चा 48 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans Beat Rajasthan Royals) शानदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरातने मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागल्याने कॅप्टन संजू सॅमसनच्या (Sanju Samson) चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

| May 06, 2023, 00:17 AM IST

Sanju Samson, RR vs GT: आयपीएल 2023 चा 48 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans Beat Rajasthan Royals) शानदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरातने मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागल्याने कॅप्टन संजू सॅमसनच्या (Sanju Samson) चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

 

1/5

राजस्थानचा संघ 17.5 ओव्हरमध्ये 118 धावा करत बाद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने 13.5 ओव्हरमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 119 धावा केल्या आणि सामना जिंकला. सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर संजूने पराभवाचं कारण सांगितलं.

2/5

आमच्यासाठी खूप खडतर सामना होता, सुरुवात करण्यासाठी खरोखर चांगला पॉवरप्ले गेला नव्हता, पण आम्ही फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष केला, असं संजू सॅमसन म्हणतो.

3/5

गुजरातचे गोलंदाज चांगली लाईन आणि लेन्थ गोलंदाजी करत होते आणि मधल्या षटकांमध्ये काही महत्त्वपूर्ण विकेट्स घेत होते आणि जेव्हा असं होतं, तेव्हा आपण काही करू शकत नाही, असं म्हणत संजूने खंत व्यक्त केलीये.

4/5

आम्हाला आमच्या कामाची यादी करावी लागेल आणि आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहोत का ते पाहावे लागेल, असं म्हणत संजूने कामगिरीवर निराशा व्यक्त केलीये.

5/5

आम्हाला आमचे ग्लब्ज वर खेचले पाहिजेत, कारण काही महत्त्वपूर्ण सामने होत आहेत आणि आम्ही पुढील दोन आठवड्यांत गेम जिंकण्यासाठी उत्सुक आहोत, असंही संजूने यावेळी म्हटलं आहे.