...तर हिरव्या त्वचेची बाळं जन्माला येतील; त्यांची दृष्टीही क्षीण असेल! वैज्ञानिकांचा इशारा

Green Skin Babies, Blindness By Birth: संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी काही धक्कादायक दावे केले असून मानवामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावर बदल होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलं आहे संशोधकांनी जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Oct 01, 2024, 15:51 PM IST
1/9

manonmars

वैज्ञानिकांनी नव्या अभ्यासानंतर काही धक्कादायक दावे केले असून असं झालं तर मानवाच्या जन्माचं संपूर्ण समिकरणचं बदलून जाईल. नेमकं काय म्हटलं आहे संशोधकांनी पाहूयात...

2/9

manonmars

अमेरिकेतील टेक्सास येथील वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये मानव खरोखरच मंगळावर वास्तव्यास गेल्यास काय होईल याबद्दलचे अध्ययन केलं आहे. या अभ्यासानंतर समोर आलेली माहिती फारच धक्कादायक असून पृथ्वीला पर्याय म्हणून मानवी वस्तीसाठी मंगळावर वस्ती करण्याची आस लावून बसलेल्या वैज्ञानिकांसाठी फारच निराशाजनक आहे.   

3/9

manonmars

टेक्सासमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये मानव मंगळावर वास्तव्यास गेल्यास त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा पडेल तसेच मानवाची दृष्टी क्षीण होईल असा दावा करण्यात आला आहे. 'इंडी 100'ने दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील राईस विद्यापीठामधील जीवशास्त्रज्ञ डॉक्टर स्कॉट सोलेमॉन यांनी, मानव मंगळावर वास्तव्यास गेल्यानंतर तिथे मानवाला जी बाळं होतील त्यांच्यामध्ये मंगळवारील भौगोलिक परिस्थितीनुसार बरेच बदल जन्मत: दिसून येतील, असा दावा केला आहे. (फोटोमध्ये राईस विद्यापीठ)

4/9

manonmars

'फ्यूचर ह्युमन्स' या आपल्या पुस्तकामध्ये मंगळावरील भौगोलिक परिस्थिती मानवासाठी तुलनेनं प्रतिकूल असल्याने मानवाला तिथे तग धरुन राहणं कठीण होईल, असं डॉक्टर स्कॉट सोलेमॉन यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मंगळावर जन्माला येणाऱ्या मानवाच्या पुढच्या पिढीमध्ये फारच वेगळे बदल दिसून येतील.  

5/9

manonmars

या लाल ग्रहावर मानव वस्तीसाठी गेला आणि तिथे त्या बाळं झाली तर त्यांच्यामध्ये अनेक जेनेटिक बदल दिसून येतील. ज्यामध्ये कमी गरुत्वार्षण, किर्णोत्सर्जनाचं अधिक प्रमाण यासारख्या गोष्टींमुळे या बाळांची त्वचा हिरव्या रंगाची असेल. तसेच त्यांचे स्नायू हे आताच्या मानवापेक्षा कमकुवत असतील. त्यांची दृष्टी फारशी विकसित झालेली नसेल तर त्यांची हाडंही ठिसूळ असतील, असा दावा डॉ. सोलेमॉन यांनी त्यांच्या 'फ्यूचर ह्युमन्स' या पुस्तकात केलाय. 

6/9

manonmars

मंगळ हा पृथ्वीपेक्षा आकाराने छोटा असल्याने त्याचं गुरुत्वाकर्षण हे 30 टक्क्यांनी कमी आहे. तसेच मंगळावरील मॅग्नेटीक फिल्ड तितकीशी भक्कम नाही. तसेच येथील ओझोनचा स्तरही फारसा सक्षम नसल्याने अंतराळून येणाऱ्या रेडिएशनचा मानवावर परिणाम होईल असा अंदाज बांधला जात आहे. 

7/9

manonmars

तसेच गुरुत्वाकर्षण कमी असल्याने हाडं ठिसूळ असतील. त्यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी समस्या निर्माण होऊ शकतात. खास करुन महिलांच्या ओटीपोटाजवळची हाडं तुटू शकतात. तसेच फार दूरचं पाहण्याची गरज नसल्याने मंगळावर जन्माला येणाऱ्या बाळांची दृष्टीही क्षीण असेल असा दावा डॉ. सोलेमॉन यांनी केला आहे.  

8/9

manonmars

मानव मंगळावर पृथ्वीप्रमाणे मुक्तपणे वावरता येईल अशा वातावरणात न राहता बंदिस्त पॉड्समध्ये राहणार असल्याने फार दूरवर पाहण्याची आवश्यकता भासणार नाही असा दावा केला जात आहे.

9/9

manonmars

आतापर्यंत मंगळावर केवळ मानवविरहित यानं गेली आहेत. मात्र अमेरिकी अंतराळ संस्था नासाने 2030 पर्यंत मंगळावर पहिला मानव पाठवण्याची योजना आखळी आहे. तर स्पेस एक्स या खासगी अंतराळ कंपनीचा मालक असलेल्या एलॉन मस्कने पुढील 30 वर्षात मंगळावर मानवाचं एखादं शहर पाहायला मिळू शकतं असं म्हटलं आहे. (राईस विद्यापीठाचा फोटो वगळता सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार, सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)