World Cup 2023 आधी गणरायाचरणी खेळाडू नतमस्तक; सचिनपासून विराटपर्यंत पाहा खेळाडूंच्या घरचे बाप्पा

Ganeshotsav 2023 च्या या रंगात भारतीय क्रिकेट संघाचे आजी-माजी खेळाडूसुद्धा न्हाऊन निघाले. चला तर मग, पाहुया खेळांडूच्या घरचे बाप्पा...   

Sep 20, 2023, 10:13 AM IST

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर Ganesh Chaturthi च्या मंगल पर्वाला सुरुवात झाली. मंगळवारी घरोघरी आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले आणि सर्वत्र एकच उत्साह पाहायला मिळाला. 

1/8

बाप्पासाठी सारंकाही

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi 2023 च्या निमित्तानं खेळाडूंनही त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत काही क्षण बाप्पाची आराधना करण्यात व्यतीत केले.   

2/8

बाप्पाचं विलोभनीय रुप

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

बाप्पाच्या विलोभनीय रुपाकडे पाहताना ही मंडळी भारावून गेली आणि मनातलं सगळंच त्याच्यापुढं बोलून दाखवलं.   

3/8

विरुष्काच्या घरी बाप्पांची स्वारी

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी फुलांच्या सुरेख सजावटीमध्ये बाप्पाची पूजा मांडली. लेक वामिकानंही या सणाचा आनंद घेतला.   

4/8

रोहित शर्माही गणरायाचरणी नतमस्तक

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, रोहित शर्मानंही गणरायाचरणी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या काळातही संघाला असंच यश दे, हेच गाऱ्हाणं जणू त्यानं गणपतीला घातलं.   

5/8

मयांक अग्रवालकडून गणेशाची पूजा

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

मयांक अग्रवालनंही गणपती बाप्पांची पूजा करत गणेश चतुर्थीचा सण सहकुटुंब साजरा केला.   

6/8

शिखर धवनच्या घरचा बाप्पा

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

टीम इंडियात दमदार खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या शिखर धवन याच्या घरीही गणपतीची पूजा मांडल्याचं पाहायला मिळालं.   

7/8

सचिन तेंडुलकर आणि कुटुंबीय

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

मास्टर ब्लास्टर सचिनही यात मागं नव्हता. सचिननं सहकुटुंब गणपतीची आराधना केली. यावेळी एकच मंगलमय वातावरण पाहायला मिळालं.   

8/8

वीरेंद्र सेहवागचा बाप्पा

Ganeshotsav 2023 Virat Kohli To Rohit Sharma Indian Cricket Stars celebrates Ganesh Chaturthi

तर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानंही अगदी साध्यासोप्या पद्धतीनं बाप्पाची पूजा केल्याचं पाहायला मिळालं. (सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया)