GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झी  २४ तास वर,  पाहा यामध्ये तुमचाही बाप्पा दिसतोय का

Sep 25, 2023, 17:17 PM IST
1/14

केरभाऊ डोंगरे, जुन्नर

केरभाऊ डोंगरे यांनी यंदा घरगुती  पद्धतीने शाडूच्या गणपतीच्या बाजूला झाडांच्या कुंड्या, वडाच्या पारंब्या, रिकामा असलेला सुगरणीचा खोपा, शेतीतील फुलांची सजावट, आकर्षक वेली, वापरात नसलेल्या वर्तमान पत्रांचे कागदी गोळे, खूप जुन्या लाकडाच्या मांडण्या, इतर उतरणीवर विविध फळे अशा पर्यावरण पुरक गोष्टींचा वापर केला आहे. या वेगळ्या पद्धतीत बाप्पा अगदी मनमोहक  दिसत आहे.   

2/14

मनीष भानुशाली

 मनीष भानुशाली  यांनी अत्यंत सुंदर  फुलांचे डेकोरेशन करून बाप्पासाठी मनमोहक  देखावा करत लाडक्या गणरायाची स्थापना केलीयं.

3/14

प्रफुल मोरे.

मोरे कुटुंबीयांना बालगणेशाचा अतिशय सुंदर देखावा केला आहे. बाप्पाचं ते लोभसवाणं रुप मनाला मोहुन टाकत आहे.गडकिल्यांवर भ्रमंतीसाठी बाप्पा गेले आहेत.असा हा देखावा करण्यात आला आहे.

4/14

जाधव परिवार, आकुर्ली

समीर जाधव  यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन खूप सुंदर रित्या केले, वेगवेगळया फुलांनी केलेली बाप्पाची मनमोहक आरास पाहा.  

5/14

रणवीर खडके

रणवीर खडके यांनी यंदा बाप्पाची सजावट आयोध्या मधील राम मंदिरयाच्या प्रतिकृतीची केली आहे. तर या विलक्षणीय स्वरूपात बाप्पा मनमोहक दिसत आहे. 

6/14

श्री संत भिवसन महाराज गणेशोत्सव मंडळ, अकोला

अकोला येथील  श्री संत भिवसन महाराज गणेशोत्सव मंडळ यांनी गणेश भक्तांसाठी   सुंदर आणि विकक्षणीय देखावा केला आहे. 

7/14

पद्मन नगर, विरार-वसई

पद्मान नगर गणेश मंडळ यांनी यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी भव्य पद्धतिने केले आहे. मात्र  बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे. यावर्षी गणेशउत्सवची थीम ही महाल म्हणून निवडली होती. तर मंडळात बाप्पा ०५ दिवसांचा पाहुणा असतो. तर दरवर्षप्रमाणेच या ०५  दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम होतात, जसे की लहान मुलांसाठी स्पर्धा, भजन, आणि धार्मिक गाणी, अशी आयोजित केली जातात. 

8/14

यश पाटील, पुणे

यश पाटील यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले आहे. सुंदर सजावट करत त्यांनी  श्री क्षेत्र तुळजापूरचा देखावा केला आणि बाप्पाचे स्वागत केले. 

9/14

शुभम सातकर अंधेरी मुंबई

मुंबईच्या सातकर कुटुंबाने यंदा चांद्रयान-3 चा अनोखा देखावा केला आहे. यामध्ये बाप्पाची मूर्ती ही खुप सुंदर दिसत आहे. 

10/14

दिनकर सोनवणे, सम्राट कॉलनी जळगांव

दिनकर सोनवणे यांनी आपल्या बाप्पाचे आगमन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक या थीम नुसार केले आहे, तर या थीम मध्ये  बाप्पाची प्रतिमा खूप सुंदर दिसत आहे.

11/14

गणपत बडे, वरळी, मुंबई

यंदा बडे परिवाराने बाप्पाची सजावट ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सार्वजनिक स्थळानुसार केली आहे. आणि या विलक्षणीय सजावटीमध्ये बाप्पा खूप सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.   

12/14

जयंत पाटील मुंबई

जयंत पाटील यांनी बाप्पाची सजावट ही अगदी भव्य पद्धतीने केली आहे.  साक्षात तिरुपती बालाजी यांची प्रतिकृती निर्माण करून बाप्पाची  स्थापना आणि पूजा केली. 

13/14

हेरंब जोशी मुंबई

हेरंब जोशी यांनी यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाची सजावट ही इकोफ्रेंडली रित्या केली आहे, तर गणेश प्रतिमा ही सुद्धा शाडूमाती ची आहे. आणि त्यांची सजावटीमधून निर्वगा वर प्रेम हे सिद्ध होत आहे. 

14/14

तन्मय कदम, डिलाईल रोड मुंबई

कदम परिवाराने यंदा महाराष्ट्रातील राजकारण याविषयी आपल्या बाप्पाचे डेकोरेशन केले आहे. मात्र या वेगळ्या पद्धतीतही आपला लाडका बाप्पा मनमोहक आणि प्रसन्न दिसत आहे.