चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोकडून मानवाला अवकाशात पाठवण्याची तयारी, 'असा' आहे प्लॅन!

Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार कुशल वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. हे प्रशिक्षण आता पूर्ण होत आले आहे. 

Pravin Dabholkar | Sep 03, 2023, 12:59 PM IST

Gaganyaan Mission: गगनयान मिशन ही अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी भारताची एकमेव अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी वर अंतराळात जाण्यासाठी पाठवणार आहे. गगनयानच्या प्रक्षेपणात मानवरहित वाहन रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवले जाणार आहे.

1/9

Gaganyaan:चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोकडून मानवाला अवकाशात पाठवण्याची तयारी, 'असा' आहे प्लॅन!

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

Gaganyaan Mission:  भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान-3 च्या घवघवीत यशानंतर इस्रोकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. इस्रोचे आदित्य एल 1 सुर्याच्या दिशेने झेपावले आहे. ही इस्रोची पहिली सुर्य मोहीम आहे. 125 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य एल 1 Lagrangian बिंदू 'L1' च्या भोवतालच्या प्रभामंडल कक्षेत केली जाईल. 

2/9

इस्रोचे पुढील मिशन

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

तेथून सूर्यावर घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर इस्रोच्या पुढील मिशनबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी मोठी माहिती दिली. 

3/9

गगनयान ऑक्टोबरमध्ये

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

आदित्य L1 मिशन हा भारतासाठी हा आनंदाचा क्षण आहे. गगनयान पुढच्याच ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, असे जितेंद्र सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. 

4/9

गगनयान मिशन म्हणजे काय?

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

गगनयान मिशन ही अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी भारताची एकमेव अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी वर अंतराळात जाण्यासाठी पाठवणार आहे. गगनयानच्या प्रक्षेपणात मानवरहित वाहन रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवले जाणार आहे. 

5/9

यंत्रणेची तपासणी

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

सर्व यंत्रणा तसेच रिकव्हरी यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी, इस्रोने भारतीय हवाई दलाला अंतराळवीरांची निवड करण्यास सांगितले होते. ज्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

6/9

चार कुशल वैमानिकांची निवड

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

गगनयान मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार कुशल वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. हे प्रशिक्षण आता पूर्ण होत आले आहे. 

7/9

रशियाला प्रशिक्षण

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

वैमानिकांनी रशियाला जाऊन यासंबंधीचे सर्व प्रशिक्षण घेतले. तेथे त्यांनी युरी ए. गॅगारिनने स्टेट सायंटिफिक रिसर्च अँड टेस्टिंग कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

8/9

उर्वरित प्रशिक्षण

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

यानंतर ते भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी आपले उर्वरित प्रशिक्षण पूर्ण केले. अंतराळवीरांना रशियाने विविध हवामान आणि ठिकाणी सुरक्षितपणे कसे उतरायचे हे देखील शिकवले होते.

9/9

3 दिवसांचे मिशन

Gaganyaan Mission After Chandrayaan-3 ISRO now preparing send humans to space

इस्रोने यापूर्वी आपल्या मानवी अंतराळ मोहिमेदरम्यान भारतीय अंतराळवीरांना गगनयानसह सात दिवस पृथ्वीभोवती फिरण्याची योजना आखली होती. पण सध्याच्या परिस्थितीनुसार, गगनयान पृथ्वीभोवती फक्त एक किंवा तीन दिवस फिरण्यासाठी प्रक्षेपित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.