नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर, 2 शिलाई मशीनने सुरुवात करणाऱ्या 'या' महिलेची संपत्ती आहे 84000000 रुपये

Fashion Designer Anita Dongre : नीता अंबानी यांचे कपडे आणि दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत असता. नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर यांनी फक्त 2 शिलाई मशीनने व्यवसायला सुरुवात केली होती. आज त्या कोट्यवधींचा मालकीण आहेत.   

Oct 01, 2024, 17:02 PM IST
1/7

नीता अंबानी या तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असतात. पारंपरिक वेशभूषा असो किंवा वेस्टन कपडे असो नीता अंबानी खूप सुंदर दिसतात. त्यांचे कपडे आणि दागिने कायम लोकांचं लक्ष वेधून घेतात. 

2/7

तुम्हाला माहितीये का नीता अंबानी यांच्या फॅशन डिझायनर कोण आहे ते? या फॅशन डिझायनर फक्त नीता अंबानी यांचेच कपडे नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीचे कपडे तयार करतात. 

3/7

त्या आहेत प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनिता डोंगरे. यांनी फक्त दोन शिलाई मशिनने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. पण आज जगभरात त्यांचे 270 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. अनिता यांचं वय 61 असून त्यांनी शिवणकामाची शिकवण आईकडून घेतली. 

4/7

1995 मध्ये अनिता यांनी बहिणीसोबत पाश्चात्य कपडे शिवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी वडिलांकडून पैसे उसने घेतले. त्यानंतर त्यांनी कपडे स्थानिक दुकानदारांना विकण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना फार यश हाती लागलं नाही. 

5/7

त्यानंतर त्यांनी अ‍ॅन्ड नावाचा स्वत:चा ब्रँड सुरू केला. त्यानंतर त्यांच्या कपड्यांना मागणी वाढू लागली. त्यानंतर 2015 मध्ये कंपनीचा 'हाऊस ऑफ अनिता डोंगरे' म्हणून री ब्रँड केली. आता त्यांच्या नावावर ग्लोबल देसी, अनिता डोंगरे ब्राइडल कॉउचर, अनिता डोंगरे ग्रासरूट्स आणि अनिता डोंगरे पिंक सिटी आहेत. 

6/7

अनिता डोंगरे यांचे लंहगा खूप प्रसिद्ध आहेत. वडिलांकडून पैसे घेऊन आणि दोन शिलाई मशिनवर व्यवसाय सुरु करणाऱ्या अनिता डोंगरे आज कोट्यवधींच्या मालकी आहे. त्यांची संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. 

7/7

आज भारतातील सर्वात श्रीमंत महिला फॅशन डिझायनर म्हणून त्यांनी नाव कमावलंय. फोर्ब्सनुसार, अनिता डोंगरे यांचं एकूण संपत्ती 84 कोटी रुपयांच्या घरात आहे.