लग्नात 1 तास गाण्यासाठी 'त्याला' मिळाला मुंबईत आलिशान Duplex Flat; एकदा कार उशीरा आली म्हणून...

Singar Got A Duplex In Mumbai For Performing At A Wedding: सामान्यपणे अगदी काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचं मानधन प्रसिद्ध गायक लग्नाच्या कार्यक्रमांसाठी घेतात. मात्र बॉलिवूडमधील एक पार्श्वगायक चक्क एका कार्यक्रमासाठी एक ड्युप्लेक्स घर मानधन म्हणून घेतो असा दावा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याने एकदा कार उशीरा आल्यानंतर त्याने काय केलेलं.

Swapnil Ghangale | Dec 08, 2024, 14:29 PM IST
1/13

arijitsingh

मानधन म्हणून पैसे नाही तर थेट ड्युप्लेक्स फ्लॅट्स घेणाऱ्या या गायकाने एकदा कार वेळेत आली नाही म्हणून काय केलं जाणून घ्या...

2/13

arijitsingh

सध्याच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी गायकांमध्ये अरजित सिंगचं नाव आवर्जून घेतलं जातं. अनेक लोकप्रिय गाण्यांना आवाज देणारा अरजित हा आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. 

3/13

arijitsingh

चित्रपटांमध्ये गाण्याबरोबरच अरजित जगभरातील अनेक शहरांमध्ये वेगवेगळे शो आणि कॉन्सर्ट्सही करतो. मात्र खोऱ्याने पैसा कमवणारा अरजित हा फारच साधा आहे. याचसंदर्भात नुकताच रॅप गायक एक्का सिंग आणि रफ्तारने भाष्य केलं आहे. भरपूर पैसा असूनही अरजित कसा साधेपणे राहतो याबद्दल हे दोघे भरभरुन बोलले आहेत. 

4/13

arijitsingh

'ऑनेस्टली सेईंग' नावाच्या पॉडकास्टमध्ये एक्का सिंग आणि रफ्तारने अरजित आर्थिक दृष्ट्‍या किती यशस्वी आहे याबद्दलची कल्पना चाहत्यांना येईल असे अनेक किस्से सांगितले आहेत. अरजितच्या कमाईबद्दलही या दोघांनी भाष्य केलं आहे.

5/13

arijitsingh

रफ्तार आणि एक्काच्या दाव्यानुसार एका लग्नाच्या सोहळ्यात गाण्यासाठी अरजित एवढा पैसा घेतो की त्या पैशांमध्ये त्याला मुंबईत ड्युप्लेक्स घर घेता येईल.

6/13

arijitsingh

केवळ एका कार्यक्रमासाठी अरजित एवढं भरघोस मानधन घेतो. अरजितचं हे यश फारच थक्क करणार आहे असं रफ्तारने सांगितलं.

7/13

arijitsingh

"तो जेवढा पैसा कमवतो ना ते फारच थक्क करणारं आहे. मात्र तो फार साधा आहे. संगीत श्रेत्रातील लोक स्वत:ला श्रीमंत म्हणवून घेतात. ते दिसतातही श्रीमंत मात्र अरजित आमच्यासारख्या 100 लोकांना एकटा पुरेसा आहे," असं रफ्तारने म्हटलं आहे.

8/13

arijitsingh

"एका शोदरम्यान त्याच्या कारला यायला उशीर होत होता तर तो समोरच्या रिक्षात बसला आणि घरी निघून गेला," असं रफ्तारने सांगितलं.

9/13

arijitsingh

पुढे बोलताना त्याने अजून एक किस्सा सांगितला. "त्याला लग्न सोहळ्यांमध्ये जाऊन गायला आवडत नाही. मात्र कोणीतरी फार आग्रह केला तेव्हा त्या लग्नात गाण्यासाठी त्याने मानधन म्हणून चक्क मुंबईत एक ड्युप्लेक्स घर घेतलं. मुंबईत ड्युप्लेक्स घर कितीला येतं ते एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. त्याने तितकं एक ते दीड तासामध्ये कमवले," असं रफ्तार थक्क होऊन सांगत होता.

10/13

arijitsingh

एक्काने जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान किती मानधन आकरतो हे सांगितलं.

11/13

arijitsingh

"रेहमान सर एका लाइव्ह शोसाठी 3 कोटी रुपये मानधन घेतात. अरजित किती घेतो हे एकदा तपासून पाहाच. प्रत्येकाचा एक काळ असतो. मात्र असं असलं तरी अरजित याचा गाजावाजा करत नाही. हा फरक आहे त्याच्यात आणि इतरांमध्ये," असं एक्का म्हणाला.

12/13

arijitsingh

काही महिन्यांपूर्वीच अरजितने अनंत अंबानी आणि राधिका अंबानी मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात परफॉर्म केलं होतं. त्यावेळेस त्याने श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, उदित नाराय आणि लकी अलीसारख्या दिग्गजांबरोबर स्टेज शेअर केला होता.

13/13

arijitsingh

पुढे बोलताना या दोघांनी अरजितचं वागणं हे जगप्रसिद्ध रॅप गायक एमएमसारखं असल्याचं सांगितलं. तो सुद्धा त्याचं खासगी आयुष्य समोर आणत नाही असं हे दोघे म्हणाले.