Fact Check: हॉटनेसमुळे ऑलिम्पिकमधून बाहेर गेली पेराग्वेची स्पर्धक? जाणून घ्या सत्य!

पेराग्वेची तैराक लुआना अलोंसोचे सौंदर्य तिच्या स्पर्धेबाहेर कारणीभूत असल्याचे यात म्हटलंय. याची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. 

Pravin Dabholkar | Aug 10, 2024, 07:31 AM IST

Fact Check: पेराग्वेची तैराक लुआना अलोंसोचे सौंदर्य तिच्या स्पर्धेबाहेर कारणीभूत असल्याचे यात म्हटलंय. याची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. 

1/10

Fact Check: हॉटनेसमुळे ऑलिम्पिकमधून बाहेर गेली पेराग्वेची स्पर्धक?

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

Fact Check: ऑलिम्पिक खेळामध्ये पेराग्वेची तैराक लुआना अलोंसोची एक बातमी सोशल मीडियात व्हायरल होतेय. अलोंसोच्या व्हायरल फोटोत दावा करण्यात आल्यानुसार, तिला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. तिचे सौंदर्य, हॉटनेस याला कारणीभूत असल्याचे यात म्हटलंय. याची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. 

2/10

ऑलिम्पिकमध्ये वादविवाद

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 33 व्या ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झाली. ऑलिम्पिक स्पर्धा आता संपायला आली आहे. 11 ऑगस्ट ही स्पर्धेची शेवटची तारीख असेल. दरम्यान ऑलिम्पिकमधून अनेक वादविवाद समोर आले आहेत. भारतीय रेसलर विनेश फोगाटला वाढलेल्या वजनामुळे मेडलपासून दूर ठेवण्यात आले. दरम्यान पेराग्वेच्या एका जलतरणपट्टूला सौंदर्याच्या आधारे ऑलिम्पिकमधून बाहेर केल्याचे वृत्तही समोर आले. 

3/10

काय केला जातोय दावा?

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

ऑलिम्पिक खेळामध्ये पेराग्वेची जलतरणपट्टू तैराक लुआना अलोंसोची बातमी सोशल मीडियात ट्रेण्ड होतेय. अलांसोचे फोटो शेअर केले जाताय. तिच्या सौंदर्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

4/10

कारण खूप मनोरंजक

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

पंकज राय नावाच्या एका व्हेरिफाईड एक्स युजरने लिहिले, 'अमेझिंग पॅरिस ऑलिम्पिक. पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अल्सन ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली होती. आपल्याच देशाच्या खेळाडूंमुळे तिला न खेळताच मायदेशी परतावे लागले. यामागचे कारण खूप मनोरंजक आहे. ती खूप सुंदर आहे. हे सौंदर्यच तिच्यासाठी शाप ठरले. तिच्यामुळे आम्ही आमच्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, आमचे लक्ष विचलित होत आहे, अशी तक्रार तिच्या सहकाऱ्यांनी केली. म्हणून पॅराग्वेच्या व्यवस्थापनाने तिला मायदेशी परत पाठवले का?

5/10

अस्वीकार्य निर्णय

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

अक्की शेरा नावाच्या व्हेरिफाईड यूजरने म्हटले,लुआना अलोन्सोला ऑलिम्पिकमधून वगळण्याचा निर्णय तिच्या सौंदर्यासारख्या वैयक्तिक वैशिष्ट्यांवर आधारित असेल तर हा निर्णय केवळ वादग्रस्तच नाही तर अस्वीकार्यही आहे. क्रीडाविश्वात खेळाडूंच्या क्षमतेवर, त्यांच्या मेहनतीवर आणि त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यांच्या वैयक्तिक रूपावर नाही. 

6/10

खेळाच्या खऱ्या भावनेला हानी

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

जर आयओसीचा निर्णय केवळ तिच्या सौंदर्यावर किंवा इतर वैयक्तिक वैशिष्ट्यांवर आधारित असेल तर तो केवळ अनैतिकच नाही तर खेळाच्या भावनेच्या विरुद्धही आहे. अशा निर्णयांमुळे खेळाच्या खऱ्या भावनेला हानी पोहोचते आणि खेळाडूंना असमान वागणूक मिळते. आयओसीचा हा निर्णय योग्य आहे का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला.ही बातमी इतर सोशल मीडियावरही अशाच दाव्यांसह व्हायरल होत आहे.

7/10

तपासात काय आलं समोर?

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

या बातमीच्या मुळाशी जाताना आम्ही प्रथम इंटरनेटवर काही कीवर्ड शोधले. Google सर्चमध्ये आम्हाला 7 ऑगस्ट 2024 रोजी ब्रिटिश वृत्तपत्र द इंडिपेंडंटवर प्रकाशित झालेले वृत्त आढळले. या बातमीनुसार अलोन्सोने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अशा सर्व अफवांचे खंडन केले आहे.

8/10

काय म्हणाली अलोन्सो?

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

'मला फक्त हे स्पष्ट करायचे आहे की मला ऑलिम्पिकमधून बाहेर काढले गेले नाही किंवा कोठूनही हाकलण्यात आले नाही. कृपया चुकीची माहिती पसरवणे थांबवा' अले अलोन्सोने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 'मला घडलेल्या प्रकाराबाबत कोणतेही विधान करायचे नाही पण मी माझ्याबद्दल खोटी माहिती पसरु देणार नाही, असेही तिने पुढे म्हटले. 

9/10

निवृत्तीची घोषणा

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

गेल्या आठवड्यात, महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरल्यानंतर लुआना अलोन्सोने निवृत्तीची घोषणा केली होती. तिच्या चाहत्यांसाठी हा खूप धक्कादायक निर्णय होता. यासंदर्भात सोशल मीडियात यूजर्स तिच्या पोस्ट खाली येऊन तिचे सांत्वन करताना दिसतायत.

10/10

निष्कर्ष काय?

Fact Check paris Swimmer Luana Alonso thrown out  olympics controversy trending news

जलतरणपटू लुआना अलोन्सोला तिच्या सौंदर्याच्या जोरावर ऑलिम्पिकमधून वगळण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. स्वत: जलतरणपटूने या अफवांचे खंडन केले आहे.