महाराष्ट्रात 5.84 लाख रोजगार कमी, खासगी नोकऱ्या 19 टक्क्यांनी घटल्या, EPFO चा धक्कादायक अहवाल

Pravin Dabholkar | Jul 30, 2024, 11:21 AM IST
1/8

महाराष्ट्रात 5.84 लाख रोजगार कमी, खासगी नोकऱ्या 19 टक्क्यांनी घटल्या, EPFO चा धक्कादायक अहवाल

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

राज्यासह देशात परकीय गुंतवणूक वाढत असून रोजगारदेखील वाढत असल्याचा दावा राज्य सरकार, केंद्र सरकार वेळोवेळी करत असते. पण नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामुळे या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कारण देशात 7 लाख नोकऱ्या कमी झाल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आलीय.कर्मचारी भविष्य निधी संस्थेने हा रिपोर्ट दिलाय.

2/8

7 लाख नोकऱ्या कमी

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

कर्मचारी भविष्य निधी संस्था म्हणजेच ईपीएफओने एक अहवाल सादर केलाय. ज्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील रोजगार किती प्रमाणात, कसे घटले? याची माहिती दिली आहे. 2023-24 मधील कमी झालेल्या नोकऱ्यांची आकडेवारी यात देण्यात आली आहे. त्यानुसार देशात एकूण 7 लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षातील ही मोठी घट आहे.

3/8

नोकऱ्या देणाऱ्या राज्यात घट

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

भारतामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू,गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो. पण या राज्यातही नोकऱ्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. 

4/8

19 टक्क्यांनी नोकऱ्या कमी

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

महाराष्ट्रात 2022-23 मध्ये 30.29 लाख नोकऱ्या होत्या. पण त्याच्या पुढच्या वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये हा दर 24.45 लाख इतका खाली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात साधारण 19 टक्क्यांनी नोकऱ्या कमी झाल्या.

5/8

काढलेले किंवा स्वच्छेने नोकरी सोडलेल्यांचे प्रमाण

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

ईपीएफओच्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरात नोकरीवरुन काढलेले किंवा स्वच्छेने नोकरी सोडलेल्यांचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण यावर्षी 12.63 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात दिसले. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव यातून समोर आलंय. 

6/8

फ्रेशर्सच्या नोकऱ्यात घट

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

कोरोना काळानंतर नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी मिळत होती. पपण आता नोकऱ्यांमध्ये घट होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.2022-23 या कालावधीत फ्रेशर्सना 1.14 कोटी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण 2023-24 मध्ये हा आकडा 1.9 कोटीवर आली. दुसरीकडे अनुभवी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 13.5 टक्के वाढ झाल्याची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

7/8

सर्वच पातळीवर परिणाम

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

कनिष्ठ पातळीवरच नव्हे तर मध्यम आणि उच्च पातळीवरही नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2023-24 या वर्षेात नोकऱ्यांमध्ये साधारण 25 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

8/8

काय घटतायत नोकऱ्या?

EPFO ​​report jobs less in Maharashtra Private jobs fall by 19 percent Marathi News

उत्पादन, निर्मती, सेवा आणि आयटी क्षेत्रात ही घट झाली आहे. जनरेटिव्ह एआय, ऑटोमेशन, रोबोटीक यामुळे कंपन्यांना लागणारी मनुष्यबळाची गरज कमी होत चालली आहे.