एका खतरनाक भूकंपानं बदलली पृथ्वीची फिरण्याची दिशा, समुद्रातही विध्वंस

जगभरात अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी विंध्वस माजवला आहे की यात अनेकजणांचा मृत्यू झाला. मात्र, पृथ्वीवर अशी एक घटना घडली होती. ज्यामुळं पृथ्वीवरील मनुष्यच नव्हे तर पृथ्वीच्या मुळ नैसर्गिक रचनेतही बदल झाला. 2011 साली आलेल्या भूकंपामुळं पृथ्वीची फिरण्याची दिशाच काही काळासाठी बदलली होती. 

Mansi kshirsagar | Jan 28, 2025, 12:59 PM IST

Japan earthquake shifted Earth's axis: जगभरात अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी विंध्वस माजवला आहे की यात अनेकजणांचा मृत्यू झाला. मात्र, पृथ्वीवर अशी एक घटना घडली होती. ज्यामुळं पृथ्वीवरील मनुष्यच नव्हे तर पृथ्वीच्या मुळ नैसर्गिक रचनेतही बदल झाला. 2011 साली आलेल्या भूकंपामुळं पृथ्वीची फिरण्याची दिशाच काही काळासाठी बदलली होती. 

1/7

एका खतरनाक भूकंपानं बदलली पृथ्वीची फिरण्याची दिशा, समुद्रातही विध्वंस

 earthquake 2011 Did the Earth shift after the earthquake in Japan

जपान अनेकदा भूकंपाने हादरले आहेत. मात्र 2011 साली आलेल्या भूकंपाने फक्त जपानच नाही तर संपूर्ण पृथ्वीला हादरवून सोडलं होतं. या भूकंपामुळं समुद्रा ते धरतीपर्यंत हाहाकार माजवला होता.   

2/7

11 मार्च 2011 साली जपानच्या उत्तर-पूर्व परिसरात टोहोकूजवळ समुद्रात आलेल्या या भूकंपाची तीव्रता 9.0-9.1 इतकी होती. हा पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात विनाशकारी भूकंपापैकी एक होता. 

3/7

9 तीव्रतेचा 1 मिनिटांचा भूकंपाने संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊ शकतो. मात्र जपानच्या या भयंकर भूकंपाने तर पृथ्वी 6 मिनिटांपर्यंत कापत होती. भूकंपाचे केंद्र प्रशांत महासागर होतं. ज्यामुळं समुद्रात 128 ते 133 फुटापर्यंत लाटा उसळल्या होत्या. अर्ध्या तासात जपानमध्ये 70 टक्क्यांपर्यंत पाणी शिरले होते. त्सुनामीच्या महाकाय लाटांनी जपानमध्ये पुर आला होता. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळं आग लागली होती.   

4/7

जपानमधील परिस्थिती इतकी भीषण झाली होती की समुद्राचं पाणी शहरांत घुसलं होतं. उंच उंच बिल्डिंग खाली कोसळल्या होत्या. तेल कंपन्यांना आगीने वेढलं होतं. आग आणि पाणी एकत्र तांडव करत होत्या. 

5/7

अधिकृत आकडेवारीनुसार, जपानमध्ये आलेल्या या भूकंपात व त्सुनामीत 19,759 लोक मृत्युमुखी पडले तर 6242 लोक जखमी झाले होते. तर जवळपास 3 हजार लोक आज पण बेपत्ता आहेत. तर, 2.28 लोक बेघर झाले.

6/7

मिळालेल्या माहितीनुसार, टोहोकू शहराच्या जमिनीच्या खाली असलेल्या सबडक्शन झोनचे 2 टेक्टोनिक प्लेट एकमेकांना 164 फुटापर्यंत सरकल्या. त्यामुळं इतका भयानक भूकंप झाला. 

7/7

जपानमधील भूकंपामुळे पृथ्वीचे परिभ्रमण एका मायक्रोसेकंदासाठी बदलले. पृथ्वीचा अक्ष काही सेकंदांसाठी बदलला होता. या भूकंपामुळे पृथ्वीच्या वस्तुमानाचे पुनर्वितरण झाले, ज्यामुळे अक्षात बदल झाला आणि यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमध्ये थोडासा बदल झाला आणि दिवस काही मायक्रोसेकंदांनी लहान झाला.