Vasubaras Rangoli : वसुबारसनिमित्त दारात काढा लाखात एक अप्रतिम रांगोळी!

Diwali Vasubaras Rangoli Designs : आली दिवाळी, वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस गाय आणि वासराला समर्पित असतो. यादिवशी गाय - वासराची पूजा करण्यात येते. वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अशी अप्रतिम रांगोळी. 

नेहा चौधरी | Oct 27, 2024, 16:41 PM IST
1/10

सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारसचा सण असणार आहे. हिंदू धर्मात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. 

2/10

कुठल्याही शुभ कार्यात आणि सणाच्या दिवशी दारात रांगोळी हवीच. रांगोळी हे शुभ आणि मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. 

3/10

हिंदू धर्मात गोवत्स द्वादशीला विशेष महत्त्व असून गाईला पवित्र मानलं जातं.   

4/10

वसुबारसनिमित्त तुम्हाला घराची शोभा वाढवाची असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रांगोळी डिझाइन्स आणल्या आहेत. 

5/10

झटपट आणि सुंदर रांगोळी काढून वसुबारस सणाचा आनंद द्विगुणीत करा. 

6/10

तुमच्या दारासमोरील रांगोळी पाहून येणारे प्रत्येक पाहुणे आनंदी होतील आणि तुमचं कौतुक करेल. 

7/10

रांगोळीचे विविध रंग वापरून तुम्ही दारासमोर सुंदर अशी गाय वासराची रांगोळी काढू शकता. 

8/10

तुम्ही ही चमच्याच्या साहाय्याने काढलेली रांगोळी ट्राय करू शकता. ही रांगोळी अगदी कमी वेळेत पूर्ण होते आणि खूप सुंदरही दिसते.

9/10

सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करा. तुमचा सण अगदी आनंदी आणि शुभ होईल. 

10/10

रांगोळीचा रंग आणि तुमचा उत्साह हा घरातील प्रत्येकाचा चेहऱ्यावर आनंद घेऊन येईल हे नक्की.