ब्रिटीश PM सुनक यांच्या लंडनमधील घरी दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! दारात रांगोळ्या, समया, रोषणाई अन्...

Diwali Celebration At 10 Downing Street By British PM: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी दिवाळी साजरी केली. या दोघांनी दिवाळीनिमित्त डाऊनिंग स्ट्रीट 10 या निवासस्थानाची खास भारतीय पद्धतीची तयारी केलेली सजावट आणि दिवाळीमय वातावरण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. क्लिक करुन पाहा फोटो...

Swapnil Ghangale | Nov 09, 2023, 08:26 AM IST
1/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीनिमित्त दिपप्रज्वलन करुन डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी या दोघांनी निमंत्रित पाहुण्यांसहीत दिवाळी साजरी केली.

2/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

सुनक आणि पत्नी अक्षता यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो @10DowningStreet या युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पाहुणे डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील घरी आले होते.

3/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती दोघांनी पाहुण्याचं आदरातिथ्य केलं. अक्षता या भारतीय पेरहावामध्ये होत्या तर ऋषी यांनी ब्लेझर आणि फॉरमल कपडे परिधान केलेले.

4/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

"आज सायंकाळी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू समाजातील पाहुण्यांचं डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त स्वागत केलं. अंधकारावर मात करुन तोजोयम दिव्यांची आरास करण्याचा हा सण आहे," असं पंतप्रधान सुनक यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलं आहे.

5/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील घराबाहेर समया प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.

6/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

डाऊनिंग स्ट्रीट 10 या ब्रिटीश पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रांगोळीही काढण्यात आली होती.

7/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत ब्रिटीश भारतीयांबरोबरच हिंदू समाजातील मान्यवरांना डाऊनिंग स्ट्रीट 10 येथील या दिवाळी सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

8/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

अनेक आमंत्रित पाहुण्यांपैकी महिलांनी आवर्जून भारतीय पेहराव केल्याचं पाहायला मिळालं.

9/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

पाहुण्यांना डाऊनिंग स्ट्रीट 10 वरील ही भारतीय पद्धतीची तयारी पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अनेकांनी या रांगोळ्यांचे आणि डेकोरेशचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

10/10

Diwali celebration 2023 at 10 Downing Street by British PM Rishi Sunak wife Akshata Murty

फुलबाज्या आणि बिनआवाजाचे फटके फोडून डाऊनिंग स्ट्रीट 10 बाहेर दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यात आला.