निरज चोप्राने लग्नात हुंडा घेतला? चुलते थेट आकडा सांगत म्हणाले, 'हुंडा घेणे आणि...'

Neeraj Chopra Marriage: भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणाऱ्या या खेळाडचं लग्न अत्यंत खासगी पद्धतीने पार पडलं. या लग्नासंदर्भात आता त्याच्या काकांनीच अनेक खुलासे केले असून त्यांनी हुंड्याबद्दलही भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 13, 2025, 14:15 PM IST
1/9

neerajchoprawedding

भालाफेकपटू निरज चोप्राने अत्यंत खासगी सोहळ्यामध्ये लग्नागाठ बांधली. मात्र या लग्नासंदर्भात त्याच्या सख्या चुलत्यांनी काही खुलासे केले आहेत. अगदी हुंड्याचाही उल्लेख यावेळी त्यांनी केलाय. ते नक्की म्हणालेत पाहूयात या फोटो गॅलरीमधून..

2/9

neerajchoprawedding

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारताचा भालफेकपटू निरज चोप्राने माजी टेनिसपटू आणि सध्या स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून शिक्षण घेणाऱ्या हिमानी मोरबरोबर विवाहबंधनात अडकला.

3/9

neerajchoprawedding

27 वर्षीय निरजने 19 जानेवारी रोजी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. या लग्नाला दोन्हीकडील मोजके नातेवाईक उपस्थित होते.

4/9

neerajchoprawedding

निरजचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी टोक्योमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निरज आणि हिमानाची पहिली भेट अमेरिकेत झाल्याची माहिती दिली. त्यानंतर निरजने घरच्यांची परवानगी घेतली. निरजला घरच्यांनी होकार दिल्यानंतर त्याने हिमानीशी लग्न करण्याचं ठरवलं, असं सुरेंद्र यांनी सांगितलं.  

5/9

neerajchoprawedding

"निरज आणि हिमानी दोघेही खेळाडूच आहेत. दोघे एकमेकांना ओळखतात. दोघे एकमेकांना अमेरिकेत भेटले. आपलं आयुष्य कोणासोबत घालवायचं आहे हे निरजलाच जास्तच योग्य पद्धतीने ठाऊक आहे. त्याने घरच्यांची परवानगी घेतली आहे. त्याने परवानगी घेतल्यानंतर हिमानीबरोबर लग्न करण्याचं ठरवलं. हे लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे," असं सुरेंद्र यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

6/9

neerajchoprawedding

निरज आणि हिमानीचा लग्न सोहळा 14 ते 16 जानेवारीदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये पार पडला. ज्या पंडितजींनी लग्न लावलं त्यांनाही निरज कोण आहे हे ठाऊक नव्हतं असं सुरेंद्र यांनी सांगितलं.   

7/9

neerajchoprawedding

लग्नाच्या एक दिवस आधी 14 तासांसाठी लग्न सोहळ्यातील काही कार्यक्रमांसाठी हिमानी निरजच्या मूळ गावीही गेली होती, असं सुरेंद्र यांनी सांगितलं. तेथेच निरज आणि हिमानीच्या लग्नापूर्वीचे सर्व पारंपारिक विधी पार पडले.  

8/9

neerajchoprawedding

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या निरजने हुंडा म्हणून किती रुपये घेतले हे सुद्धा सुरेंद्र यांनी सांगितलं. चोप्रा कुटुंबाचा हुंडा देण्याला आणि घेण्याला विरोध असल्याने शुभ शकून म्हणून निरज आणि चोप्रा कुटुंबाने केवळ 1 रुपया घेतल्याचं सुरेंद्र म्हणाले.

9/9

neerajchoprawedding

"आमचा हुंडा प्रथेला विरोध आहे. हुंडा घेणे आणि देणे आम्हाला मान्य नाही. म्हणूनच आम्ही शुभ शकुनाचा एक रुपया घेतला," असं निरजच्या काकांनी स्पष्ट केलं.