'देसी गर्ल'चा बॅकलेस लूक व्हायरल
प्रियांका तिच्या आगामी 'स्काय इज पिंक' चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी भारतात आली आहे.
मुंबई : जगातील सर्वात आवडतं व्यक्तीमत्व असलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या मायदेशी दाखल झाली आहे. नुकताच तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोंमधील तिचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार प्रियांका तिच्या आगामी 'स्काय इज पिंक' चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी भारतात आली आहे. या गाण्यात प्रियांका शिवाय फरहान अख्तर आणि झायरा वसीम एकत्र झळकणार आहे.
1/5
प्रियांका चोप्रा मुंबईमध्ये दाखल
2/5
साडी म्हणजे भारतीय संस्कृती
मुखपृष्ठासाठी फोटोशूट केल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'फॅशनच्या जगात संस्कृती सर्वात महत्वाचा भाग आहे. काही गोष्टी वेळेनुसार पारंपरीक संस्कृतीचा दर्जा घेतात. भारतात साडीला अनन्यसाधारण महत्व आहे, आणि या पारंपरीक संस्कृतीची जागा कोणतेच दुसरे कपडे घेवू शकत नाही. '
3/5
मुंबईच्या विमानतळावर प्रियांकाला स्पॉट केले.
4/5