दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...

Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा. 

नेहा चौधरी | Aug 04, 2024, 09:49 AM IST
1/7

आज दिव्यांची आवास म्हणजे दीप अमावस्या आहे. यादिवशी महाराष्ट्रात घरोघरी दिवे लावून त्यांची पूजा केली जाते. 

2/7

या दिव्यांची पूजा खास गोड कणकेच्या दिव्यांनी पूजा करण्याची परंपरा आहे. यादिवशी कणकेच्या दिव्यांना अतिशय महत्त्व असतो. 

3/7

संध्याकाळी सर्व दिवे स्वच्छ करुन पाट किंवा चौरंगावर दिव्यांची आरास, भवताली रांगोळी आणि कणकेच्या दिव्यांनी पूजा आणि त्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आजही पाळली जाते. 

4/7

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला पितरांचं स्मरण केलं जातं. यादिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म आणि कार्य केलं जातं. 

5/7

प्रत्येक अमावस्येचं धर्मशास्त्रात वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आषाढ किंवा दर्श अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते. कारण याचा दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. 

6/7

यादिवशी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करुन घरातील दक्षिण दिशेला लावला पाहिजे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. 

7/7

हा कणिकेचा दिवा खास करुन गुळाच्या पाण्यापासून बनवला जातो. त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी दीप अमावस्येला एक कणकेचा दिवा दक्षिण दिशेला नक्की लावा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)