वर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा

वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने  मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे. 

Oct 26, 2023, 17:54 PM IST

वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने  मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे. 

 

1/6

ऑनलाइन उत्पादन विकत घेताना नेहमी मिक्स-अप किंवा चुका होणे स्वाभाविक आहे. बरेचदा, लोकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या गोष्टींऐवजी वेगवेगळ्या वस्तू मिळतात. तर आशयाचं एका प्रसंगात, आर्यन नावाच्या ग्राहकाने असा दावा केला की त्याला त्याने ऑर्डर केलेल्या सोनी टीव्हीऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला आहे, ज्याची किंमत ₹ 1 लाख आहे. आर्यन ने हे X वर शेअर केले होते, जिथे सर्वांचं लक्ष वेधले गेले.  

2/6

यूजरने लिहिले, ''मी 7 ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्ट वरून सोनी टीव्ही खरेदी केला होता, 10 ऑक्टोबर डिलिव्हरी झाली आणि 11 ऑक्टोबर रोजी सोनी इंस्टॉलेशनचा माणूस आला, त्याने स्वतः टीव्ही अनबॉक्स केला आणि आत एक थॉमसन टीव्ही पाहून आम्हाला धक्का बसला. सोनी बॉक्समध्ये स्टँड, रिमोट इ. सारख्या अॅक्सेसरीज नसतात.'' त्यांनी अनबॉक्सिंगची फोटो देखील शेअर केले, नंतर  त्यांनी फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरशी त्वरित संपर्क साधला आणि समस्या मांडली, परंतु दोन आठवड्यांनंतरही फ्लिपकार्टची अजून काही प्रतिक्रिया नाही.   

3/6

आर्यन ने पुढे सांगितले  'मी हा मुद्दा फ्लिपकार्ट कस्टमर केअरकडे तत्काळ मांडला आणि त्यांनी मला टीव्हीच्या इमेज अपलोड करायला सांगितल्या, मी इमेज अपलोड केल्या आहेत, तरीही त्यांनी मला दोन-तीन वेळा इमेज अपलोड करायला सांगितल्या आणि मी सांगितल्याप्रमाणे ही अपलोड केले.  तरी, विनंती केल्यानुसार अनेक वेळा फोटो अपलोड केल्यानंतरही, कंपनीने त्याच्या परताव्याच्या विनंतीवर काही  उत्तर देत नाही आहे. 

4/6

फ्लिपकार्टच्या कस्टमर केअर ने आर्यनला ''आधी 24 ऑक्‍टोबरची रिसोल्युशन  तारीख दिली पण 20 तारखेला त्यांनी ती रिसॉल्व्हड म्हणून दाखवली आणि नंतर ती तारीख 1 नोव्हेंबपर्यंत वाढवली. आजही त्यांनी सांगितले की हा प्रश्न सुटला आहे आणि त्याची परतीची विनंती देखील आहे. पण प्रक्रिया काही पुढे जात नाही. 

5/6

मी टीव्ही विकत घेण्यासाठी बिग बिलियन डे ची वाट पाहत होतो जेणेकरून मी एका चांगल्या मोठ्या स्क्रीनवर विश्वचषक पाहू शकेन पण फ्लिपकार्टच्या या सेवेने मला तणावात ढकलले आहे जे खरोखर असह्य आहे. कृपया मदत करा," त्याने पुढे लिहिले होते. तर फ्लिपकार्टने आर्यनच्या व्हायरल पोस्टला उत्तर दिले की, ''परताव्याच्या विनंतीबद्दल आम्हाला खेद आहे. आम्ही तुमच्यासाठी हे प्रकरण सोडवू इच्छितो. कृपया तुमच्या ऑर्डरच्या तपशीलांसह आम्हाला मेसेज करा जेणेकरून ते येथे गोपनीय राहतील.'' 

6/6

त्याच्या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी अशाच तक्रारी शेअर केल्या. एका यूजरने लिहिले की, 'भाऊ तुमच्यासाठी वाटत आहे. मी कधीही फ्लिपकार्टवरून महागडी किंवा मोठी इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणार नाही. मी ऑर्डर केलेल्या फोनचा मला वाईट अनुभव आला. पण फोन अजूनही चालत आहे. कोणतीही मोठी गोष्ट घेण्यासाठी हा एक भयानक अनुभव असेल. त्यापेक्षा मी ते जवळच्या दुकानातून विकत घेईन.''