क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा भारत-पाकिस्तान भिडणार, एशिया कपचं वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2024 Schedule: आयपीएल सुरु असतानाच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असणार आहेत. एशियन क्रिकेट काऊन्सिलने एशिया कपचं 2024 वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

| Mar 27, 2024, 12:44 PM IST
1/7

देशात आयपीएलची धूम सुरु आहे. तब्बल दोन महिने चाहत्यांना रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहिला मिळणार आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. 

2/7

एशियन क्रिकेट काऊन्सिलने एशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. येत्या जुलै महिन्यात वुमेन्स एशिया कप 2024 स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे.

3/7

19 ते 28 जुलैदरम्यान श्रीलंकेतल्या दांबुला इथं वुमेन्स एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानाच ब्लॉकबस्टर सामना 21 जुलैला रंगणार आहे.

4/7

भारत आणि पाकिस्तान महिला संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि युएई या चार संघांचा समावेश आहे. तर ग्रुप-बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका मलेशिया आणि थायलंड या चार संघांचा समावेश आहे.

5/7

भारतीय महिला संघाच्या मिशन एशिया कपची सुरुवात 19 जुलैला होणार आहे. 19 जुलैला भारत-युएई सलामीची लढत रंगेल. त्यानंतर 21 जुलैला पाकिस्तान आणि 23 जुलैला टीम इंडिया नेपाळबरोबर दोन हात करेल.

6/7

प्रत्येक ग्रुपमधन टॉप दोन संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतील. वुमेन्स एशिया कप 2024 स्पर्धेची सेमीफायनल 26 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर 28 जुलैला स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल.

7/7

वुमेन्स एशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने आतापर्ंयत तब्बल 7 वेळा एशिया कपवर नाव कोरलं आहे. 2022 ला टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.