कोरोना : रायगडमधील बोडणी ग्रामस्थ आक्रमक, अधिकाऱ्यांना माघारी धाडले
बोडणीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना गावात घेण्यास केला मज्जाव.
रायगड जिल्ह्यातील बोडणीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि अधिकारी कर्माचाऱ्यांच्या अंगावर धावत जात पिटाळले
1/5

2/5

अलिबाग तालुक्यात कालपर्यंत ७३९ कोरोना रुग्ण नोंद करण्यात आले आहेत. त्यातील तब्बल ७२ रूग्ण एकटया बोडणी गावात आहेत. तेथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना गावात घेतले नाही. आधी आरोग्याच्या सेवा द्या, नंतर पुढचे बघू असे सांगत ग्रामस्थांनी अक्षरशः धिंगाणा घातला. ३०० ४०० ग्रामस्थ आणि महिलांचा जमाव अधिकाऱ्यांवर , कर्मचाऱ्यांवर धावून आला.
3/5

३०० ४०० ग्रामस्थ आणि महिलांचा जमाव अधिकाऱ्यांवर , कर्मचाऱ्यांवर धावून आला. त्यात महिला अग्रभागी होत्या. आम्हाला शासनाकडून आरोग्य विषयक कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्या सुविधा आधी द्या नंतरच तुम्ही या, असा पवित्रा घेत भंडावून सोडले. यावेळी आक्रमक झालेले ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
4/5

अलिबाग तालुक्यात कालपर्यंत ७३९ कोरोना रुग्ण नोंद करण्यात आले आहेत. त्यातील तब्बल ७२ रूग्ण एकटया बोडणी गावात आहेत. तेथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना कोरोनाबाबत काय खबरदारी बाळगावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ , गटविकास अधिकारी दीप्ती पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे , सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी सकाळी ११ वाजता गावात पोहोचले . तेव्हा ग्रामस्थांनी अक्षरशः धिंगाणा घातला.
5/5
