येळकोट येळकोट जय मल्हार! 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी खंडोबाला घातलं साकडं

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनानंतर भंडा-याची उधळण करण्यात आली. 

Aug 07, 2023, 17:41 PM IST

Shasan Aplya dari Jejuri :  जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि राज्याची भरभराट होवू दे असं साकडंच खंडोबाला घालण्यात आले. 

1/6

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम पार पडाला. 

2/6

राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे. राज्यात सर्व जाती धर्मामध्ये सलोखा नांदू दे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करावी. तसंच पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना खंडेरायाचरणी केली असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

3/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तळी भरत भंडाऱ्याची उधळण केली. 

4/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते खंडोबाची पूजा करण्यात आली. 

5/6

या सर्वांनी कार्यक्रमाआधी मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतलं. 

6/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील जेजुरीत आले होते.