नागरिकांचा बेजबाबदारपणा वाऱ्यावर
संचारबंदीच्या आदेशानंतरही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर
पुण्यातील मार्केट यार्डात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सुरुवातीला पोलीस भाजी खरेदीसाठी रांगेत सोडत होते मात्र गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तर नाशिकच्या बाजार समितीत आज प्रचंड गर्दी दिसून आली. एकंदर मागणी लक्षात घेता नवी मुंबई बाजार समितीमध्ये आज भाज्यांच्या ७०० गाड्याची आवक झाली. तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही भाज्यांची आवक वाढली आहे. भाज्यांचे दर घसरल्यां स्वस्त भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांही झुंबड उडालीये.