दर महिन्याला तेल बदला आणि हृदयविकारापासून लांब रहा

Oct 24, 2018, 14:59 PM IST
1/6

भारतात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुऴे हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.

2/6

भारतात २० ते २९ या वयोगटात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

3/6

कोलेस्ट्रॉलमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार बळावण्याची भीती आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही डॉक्टरांनी एक सोपा उपाय सुचविला आहे.

4/6

घरात वापरले जाणारे खाद्य तेल दर महिन्याला बदलावे असा हा उपाय डॉक्टरांनी सुचवला आहे.

5/6

एका महिन्यात शेंगदाण्याचे तेल, पुढच्या महिन्यात करडीचे तेल आणि तिसऱ्या महिन्यात सूर्यफुलाचे तेल वापरावे. सोयाबीन किंवा राईचे तेल वापरत असाल तरी चालेल.

6/6

कोलेस्ट्रॉल हा चरबीचाच एक प्रकार आहे जो रक्तामध्ये जमा होत असतो आणि त्याचा अतिरेक झाला की ते रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.