मराठी अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांनी जमवले होते पैसे, कोणत्या OTT वर पाहता येईल?

Cannes Film Festival 2024 Manthan Movie : जगभरात चर्चा अससणाऱ्या याच भारतीय सिनेविश्वात मैलाचा दगड ठरलेला एक चित्रपट थेट कान्सपर्यंत पोहोचला असून, तिथं Salle Bunuel मध्ये त्याचं स्क्रीनिंग पार पडलं.   

May 18, 2024, 11:44 AM IST

Cannes Film Festival 2024 Manthan Movie : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक दमदार कथानक साकारत दिग्दर्शकांनी भारतीय संस्कृती, समाज, तत्कालीन रुढी आणि विचारसणीवर उजेड टाकला. 

1/8

कान्स चित्रपट महोत्सव

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

Cannes Film Festival 2024 Manthan Movie : 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय हिंदी चित्रपट विश्वातील मैलाचा दगड म्हणवला गेलेला 'मंथन' हा चित्रपट दाखवण्यात आला.   

2/8

श्याम बेनेगल यांचं दिग्दर्शन

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयानं अनेकांचीच मनं जिंकली होती. 

3/8

चित्रपटातील कलाकार

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

कान्सच्या क्लासिक विभागामध्ये स्क्रीनिंगसाठी निवड झालेला हा एकमेव चित्रपट असून, त्यामध्ये स्मिता पाटील यांच्याव्यतिरिक्त नसिरूद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, आनंद नाग, अमरीश पुरी या कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका आहेत. 

4/8

धवल क्रांती

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

धवल क्रांतीवर आधारित या चित्रपटातून वर्गिस कुरियन यांच्या कार्यावर उजेड टाकण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाची निर्मिती कोणा बड्या निर्मात्यानं किंवा कुठल्या धनाढ्य व्यक्तीनं केलेली नाही. 

5/8

शेतकऱ्यांचा निधी

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

'मंथन' चित्रपटाची निर्मिती केली होती देशातील पाच लाख शेतकरी. गुजरात कॉपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनशी संलग्न असणाऱ्या आणि दुग्धव्यवसायात सक्रिय असलेल्या या मंडळींनी पै पै जोडून या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट देशातील पहिला क्राऊडफंडिंग अर्थात लोकसहयोगातून साकारण्यात आलेला चित्रपट होता. 

6/8

दोन - दोन रुपये

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन - दोन रुपये गोळा करत मोठा निधी एकत्र करत या चित्रपटासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. खुद्द वर्गिस कुरियन यांनीच विजय तेंडुलकर यांच्या साथीनं या चित्रपटासाठी पटकथालेखन केल्याचं सांगितलं जातं. 

7/8

राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

1977 मध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा हा चित्रपट आजही प्रेक्षक युट्यूबवर पाहू शकतात. त्याशिवाय zee5 वरही श्याम बेनेगल यांची ही अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. 

8/8

ऑस्करपर्यंत मजल

Cannes Film Festival 2024 Manthan movies interesting facts farmers money

1976 ऑस्कर पुरस्कारांसाठी या चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालं होतं. भारताकडून ऑस्करसाठीची ही अधिकृत प्रवेशिका होती. भारतीय सिनेविश्वाचा एक वेगळा पैलू दाखवणारा हा चित्रपट सिनेरसिकांच्या Watchlist मध्ये असायलाच हवा.