महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा

buddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या. 

| May 23, 2024, 00:16 AM IST

Global Vipasana Pagoda Borivali Mumbai :  मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. बोरवली येथील ग्लोबल पॅगोडा हा महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पॅगोडा परिसर अतिशय मोठा तितकाच सुंदर आहे.  जाणून घेऊया या पॅगोडा विषयीची माहिती. 

1/7

बोरवली येथील ग्लोबल पॅगोडा जगातील आधुनिक आश्चर्य मानले जाते. हा पॅगोडा स्थापत्य शैलीचा अनोखा आविष्कार आहे.  

2/7

मुंबई परिसरात आज अनेक बौद्ध लेणी आहेत.  ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट दिल्यावर बौद्ध धर्माची एक वेगळी ओळख  पहयाला मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे विपश्यनेचे महत्त्व लक्षात येते.   

3/7

पॅगोडाच्या प्रवेशद्वारावर साडेएकवीस फूट उंच आणि 80 मेट्रिक टन वजनाच्या मार्बलपासून बनवलेली बुद्धाची मूर्ती आहे. विशिष्ट प्रकारची भलीमोठी घंटा, नगारा घेऊन उभे असलेल्या धम्मसेवकांचे पुतळे, बोधीवृक्ष, अशोकस्तंभ आणि धम्मचक्र अशी बुद्धांशी संबंधित प्रतीकेही पॅगोडाच्या परिसरात पाहायला मिळतात.  

4/7

विशेष म्हणजे डोमच्या मध्यभागी असलेला दगड तब्बल आठ हजार किलो वजनाचा असून तो जमिनीपासून 90 फुट उंचीवर आहे. याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. या डोम मध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार माणसे ध्यान धारणेला बसू शकतात. 

5/7

 प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आला आहे. 

6/7

फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पगोडा आहे.  हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा, अथवा लोखंड-स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही.

7/7

गोराई खाडी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर असेलला हा ग्लोबल पॅगोडा   मुंबईच नाही, जागतिक आश्चर्याचाच नमुना आहे.