IRCTC नाही तर 'या' अॅपवर एका मिनिटाच्या आत करा ट्रेनचं कन्फर्म तिकीट बुक

जर तुम्ही देखील कन्फर्म तिकीट कसं बुक करायचा हा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्यामध्ये तुम्ही एका मिनिटाच्या आत तिकीट बुक करु शकता. 

Soneshwar Patil | Nov 17, 2024, 18:53 PM IST
1/7

रेल्वे बुकिंग अॅप

आता तुम्ही एका मिनिटाच्या आत रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करू शकता. त्यासोबतच तुम्हाला कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. 

2/7

इतर अॅप्स

यामध्ये तुम्हाला IRCTC वेबसाईटचा वापर न करता इतर अॅप्सद्वारे तुम्हाला हे रेल्वेचे तिकिट बुक करावे लागणार आहे. 

3/7

IRCTC रेल कनेक्ट अॅप

या अॅपद्वारे तुम्ही तत्काळ तिकिट सहजपणे बुक करू शकता. तसेच तुम्ही पीएनआर स्थिती देखील तपासू शकता. 

4/7

Paytm

पेटीएम हे ट्रेन बुकिंगसाठी बेस्ट अॅप आहे. याद्वारे तुम्ही रेल्वेचे कन्फर्म तिकिट बुक करू शकता त्यासोबत कॅशबॅक देखील जिंकू शकता. 

5/7

Goibibo

Goibibo हे अॅप रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी एक उत्तम अॅप आहे. यामधून तिकीट बुक केल्यास तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. 

6/7

ConfirmTkt

ConfirmTkt या अॅपमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. ज्याच्या मदतीने तत्काळ तिकीट सहज बुक करता येते. त्यासोबतच या अॅपचा इंटरफेस देखील खूप आकर्षक आहे. 

7/7

MakeMy Trip

MakeMy Trip अॅपद्वारे देखील रेल्वेचे तिकीट सहजपणे बुक करता येते. या अॅपमध्ये तुम्हाला तिकीटासह विम्याची देखील सुविधा मिळते.