PHOTO : खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; कोणी लग्न केलं तर कोणाचं करिअर झालं उद्ध्वस्त

Bollywood Actress Affair With Gangster : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं नाव एकेकाळी गँगस्टरशी जोडलं गेलं होतं. दिसायला सुंदर आणि अभिनयातही सरस अशा अभिनेत्रींनी खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त केलं. 

नेहा चौधरी | Dec 05, 2024, 11:05 AM IST
1/8

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत ज्यांनी आपल्या कामाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण त्यातील बॉलिवूड अभिनेत्रींची नावे डॉन किंवा गुन्हेगारांशी देखील जोडलेली आहेत.

2/8

त्यामुळे अनेक अभिनेत्रींचं करिअर खराब झालं. काही चित्रपटांपासून दुरावले तर काहींनी लग्न करून नवीन कुटुंब सुरू केलं. कोण आहेत या अभिनेत्री पाहूयात.  

3/8

जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, हो हिचं नाव ठग सुकेश चंद्रशेखरसोबत जोडलं गेलं होतं दोघांचे एकत्र काही खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुकेशच्या अटकेनंतर जॅकलिनलाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होतं. तुरुंगात बसून सुकेशने जॅकलिनला अनेकदा प्रेमपत्रे लिहिल्याचं समोर आलं होतं.   

4/8

मंदाकिनी

जुन्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली मंदाकिनीचा संबंध एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी होता, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, अभिनेत्रीने या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर लोक मंदाकिनीपासून दूर राहिला लागले. 

5/8

अनिता आयुब

या यादीत अनिता अयुबच्या नावाचाही नावाचा समावेश आहे. एका गँगस्टरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे ती चर्चेत आली होती. त्याचं नाव गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशीसोबत जोडल्या गेलं होतं. 

6/8

मोनिका बेदी

या यादीत अभिनेत्री मोनिका बेदीचाही नाव आहे. मोनिकाचे नावही डॉन आणि गँगस्टर अबू सलीमसोबत जोडले गेले आहे. त्यामुळे तिला अटकही करण्यात आली आहे.

7/8

ममता कुलकर्णी

शाहरुख खान आणि सलमान खानसोबत करण अर्जुनमधील अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचं नाव मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी जोडलं गेलं होतं. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला तुरुंगातही जावं लागलं होतं. यानंतर तिने भारत सोडलं होतं. तब्बल 25 वर्षांनंतर ममता कुलकर्णी भारतात परतलीय. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर ती भावूक झाली. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. 

8/8

चमेली धुन्ना

'वीराना' हा हॉरर चित्रपट तुम्हाला आठवतो, या चित्रपटातील अभिनेत्री जस्मिन धुन्नाने चाहत्यांची मनं जिंकली होती. पण गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत हिचं नाव जोडल्या गेलं अन् जस्मिनला भारत सोडावं लागलं.