15 वर्षांपूर्वीचा अक्षय कुमारचा चित्रपट जो फ्लॉप व्हायला नको होता; आता OTT वर ठरतोय नंबर 1

Akshay Kumar Biggest Flop Film: एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीत हिट मशीन म्हणून ओळखला जायचा. तो ज्या चित्रपटात काम करायचा ते हिट व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायचे.  त्यामुळेच त्याला 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखलं जायचं. पण नंतर त्याच्या करिअरला नजर लागली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप झाला व्हायला नको होता.  

Shivraj Yadav | Oct 21, 2024, 18:24 PM IST

Akshay Kumar Biggest Flop Film: एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीत हिट मशीन म्हणून ओळखला जायचा. तो ज्या चित्रपटात काम करायचा ते हिट व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायचे.  त्यामुळेच त्याला 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखलं जायचं. पण नंतर त्याच्या करिअरला नजर लागली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप झाला व्हायला नको होता.

 

1/9

90 च्या दशकात पदार्पण करणारा अक्षय कुमार 30 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत आहे. यादरम्यान त्याने डझनभर हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. पण जुन्या काळात ही एक सामान्य गोष्ट होती. पण गेल्या काही काळापासून त्याला बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. आज आम्ही तुम्हाला 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. अक्षयचा हा एक चित्रपट होता ज्याची कथा खूपच छान होती.  

2/9

अक्षय कुमारचा हा चित्रपट 15  वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात अक्षय कुमारसह आयशा टाकिया, शर्मिला टागोर आणि जावेद जाफरी यांसारखे इतर अनेक दिग्गज कलाकार होते.   

3/9

या चित्रपटाची कथा सामान्य वाटत असली तरी त्यात अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तो वेगळा ठरतो. असे असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला. तथापि, इतक्या वर्षांनंतर जेव्हा तो OTT वर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  

4/9

या चित्रपटाचे नाव आहे '8 x 10 Pics' आणि हा चित्रपट त्याच्या मुख्य व्यक्तिरेखेभोवती (अक्षय कुमार) फिरतो. या चित्रपटात त्याने जय पुरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्याकडे एक अशी शक्ती असते ज्यामुळे फक्त फोटो पाहून तो क्षण एका व्हिडीओप्रमाणे पाहू शकत असते.   

5/9

ही एक विचित्र शक्ती आहे आणि या शक्तीचा उपयोग तो इतरांना मदत करण्यासाठी करतो. पण एके दिवशी त्याच्यासोबत असं काही घडतं, ज्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं आणि कथेला वळण मिळतं.   

6/9

चित्रपटात शर्मिला टागोर यांनी अक्षयच्या आईची भूमिका साकारली होती. आयेशा टाकियाने प्रेयसी तर जावेद जाफरीने पोलिसाची भूमिका केली होती. तथापि, एक उत्कृष्ट कथा असूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार वाईट पद्धतीने आपटला.   

7/9

विकिपीडियानुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 35 कोटी रुपये होते आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 14 कोटी रुपये कमावू शकला. हा चित्रपट आपल्या बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही. अनेक वर्षांनंतर, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून आता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

8/9

2009 मध्ये, OTT प्लॅटफॉर्म सारख्या गोष्टी नव्हत्या. अशा परिस्थितीत लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत असत किंवा घरी टीव्हीवर तो चित्रपट प्रसारित होण्याची वाट पाहत असत. पण आता ओटीटीच्या जमान्यात अगदी जुने चित्रपटही पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अनेक वर्षांनी अक्षयचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. जिथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतआहे.   

9/9

तुम्हालाही हा चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्ही तो Zee5 वर पाहू शकता किंवा YouTube वर विनामूल्य पाहू शकता.